करण जोहर
मुंबई, 17 ऑक्टोबर : फिल्ममेकर करण जोहरचा बहुचर्चित असलेला शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. या शोमध्ये करण सेलिब्रिटींशी गप्पा मारत काही प्रश्न विचारत असतो. त्यामुळे कलाकारांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा होतो. त्यांच्या वैयक्तिक, खाजगी, लव लाईफविषयी अनेक खुलासे होतात. त्यामुळे प्रेक्षकही आवडीनं हा शो पाहतात. शोच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये जो कलाकार जिंकेल त्याला खास गिफ्ट हॅम्पर मिळतं. या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की काय मिळतं याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना असती. आता या गिफ्ट हॅम्परमधे काय असतं याचा खुलासा करण जोहरने केला आहे. करणचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो गिफ्ट हॅम्परमधे काय असतं याविषयी सांगत आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांपासून तर खव्याच्या मिठाईपर्यंत अनेक वस्तू या हॅम्परमधे असतात. त्यामुळे हे गिफ्ट हॅम्परसाठी कलाकार चढाओढ करताना दिसतात. पाहा व्हिडीओ -
करणचा हा शो डिज्नि प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत असतो. यावेळी करण जोहरच्या या शोमध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, समंथा, अक्षय कुमार, कियारा अडवाणी, शाहिद कपूर यांच्यासह अनेक स्टार्स दिसले.
दरम्यान, या शोचा प्रत्येक सीझन लोकप्रिय ठरतो. प्रत्येक सीझनमध्ये कलाकारांविषयी अनेक खुलासे पहायला मिळतात. दरवर्षी नवीन गिफ्ट हॅम्पर असतं. यंदाचा सीझन दरवर्षीप्रमाणे गाजला.