JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Karan Johar: 'या' प्रसिद्ध स्टारकिडवर करण जोहर नाराज; कारण ऐकून वाटेल आश्चर्य

Karan Johar: 'या' प्रसिद्ध स्टारकिडवर करण जोहर नाराज; कारण ऐकून वाटेल आश्चर्य

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आपल्या रॉयल लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. सध्या तो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या भागात व्यग्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट-   बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आपल्या रॉयल लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. सध्या तो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या भागात व्यग्र आहे. हा चॅट शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी करण जवळजवळ 1 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. करण जोहरने अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याच्या चित्रपटाचं बजेटदेखील मोठं असतं. परंतु सध्या बजेटनेच करण जोहरला हैराण केलं आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. करण जोहरवर नेहमीच नेपोटीझम पसरवण्याचा ठपका लावला जातो. कारण करण जोहर आपल्या चित्रपटांमधून आउटसाईड कलाकारांना संधी देण्याऐवजी स्टारकिड्सना लाँच करतो. या कारणामुळे सोशल मीडियावर त्याला सतत ट्रोल केलं जातं. करण जोहरने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर,अनन्या पांडे,शनाया कपूर अशा एक ना अनेक स्टारकिड्सना आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवून दिली आहे. करणचं प्रत्येक स्टारकिड्ससोबत फारच छान बॉन्डिंग आहे. परंतु सध्या एका स्टारकिडनं करणला चकित केलं आहे. त्या दोघांमध्ये मानधनावरुन मतभेद सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. करण जोहरला मानधनासाठी हैराण करणारा स्टारकिड कुणी इतर नसून जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आहे. टायगर श्रॉफ सध्या करण जोहरच्या ‘स्क्रू ढीला’ चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटासाठी टायगर श्रॉफला करणने 20  कोटींची ऑफर दिली आहे. मात्र टायगर यासाठी 35 कोटींची मागणी करत आहे. परंतु अलीकडच्या काही फ्लॉफ चित्रपटांमुळे आणि आगामी चित्रपटाचं बजेट जास्त असल्यामुळे करण टायगर श्रॉफची मागणी मेनी करत नसल्याचं म्हटलं जात आहे. पण टायगर आपला हट्ट सोडत नसल्याचंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. **(हे वाचा:** दिवंगत अभिनेते इरफान खानच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण; ‘काला’च्या ऑडिशनवेळी झाली होती वाईट अवस्था ) तसेच हा वाद 2021 मधील असल्याचा अंदाज आता लावला जात आहे. कारण 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरने म्हटलं होतं की, आजचे नवीन कलाकार ज्यांनी अजूनही नीट बॉक्स ओफीवर स्वतःला सिद्ध केलेलं नाहीय. ते आमच्याकडे 20-30 कोटी रुपयांची मागणी करत आहे. का आम्ही या स्टार्सना 20  कोटी रुपये द्यायचे आणि टेक्सनीशियन्सना फक्त 55 लाख द्यायचे. असं म्हणत करणने आपली नाराजी व्यक्त केली होती. सद्यस्थिती सांगायची झाली, तर नुकतंच टायगर श्रॉफ क्रिती सेननसोबत करण जोहरच्या ‘कोफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार आहे. त्याचा रंजक प्रोमोही समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या