JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kapil Sharma चा नवा लुक पाहिला का?; जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, पाहा PHOTO

Kapil Sharma चा नवा लुक पाहिला का?; जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, पाहा PHOTO

लोकांना पोट धरुन हसवणारा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. हा कॉमेडी शो टीव्हीवर पुनरागमन करणार असून शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जाहिरात

Kapil Sharma

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट: लोकांना पोट धरुन हसवणारा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. हा कॉमेडी शो टीव्हीवर पुनरागमन करणार असून शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या या शोविषयी नवनवीन माहिती समोर येत असलेली पहायला मिळतेय. अशातच कपिल शर्माच्या नव्या सीझनसाठी कॉमेडी किंग कपिलनंही खास तयारी केली आहे. नुकतंच त्यानं एक फोटो शेअर केला असून याचीच चर्चा जोरदार रंगल्याचं दिसतंय. कपिलनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमधील फोटोने आणि पोस्टच्या कॅप्शननं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. कपिलनं शेअर केलेल्या फोटोत कपिलचा नवा अवतार पहायला मिळतोय. कपिलचा नवा लुक नव्या सीझनसाठीचा आहे. कपिलनेही नव्या सीझनमध्ये आपल्या नव्या लूकने चाहत्यांना प्रभावित करायचं ठरवलेलं दिसतंय. त्याचा हा नवा अवतार पाहून चाहत्यांनी पोस्टवर कमेंटचा वर्षाव केलाय. ‘उफ्फ स्मार्टी, हा हॅडसम मुलगा कोण आहे, लुकिंग शार्प, टोटली ट्रान्सफॉर्मेशन’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट पोस्टवर येताना दिसतोय.

संबंधित बातम्या

कपिल शर्माने त्याच्या शोच्या नवीन सीझनसाठी त्याच्या लूकमध्ये जबरदस्त बदल केले आहेत. हेअरस्टाइलपासून शेव आणि फिटनेसपर्यंत त्यानं सगळंच चेंड केलंय. कपिल फुल ऑन स्वॅगमध्ये दिसत आहे. कपिला हा नवा बदल, नवं ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत. त्याच्या नव्या लुकला पसंती दर्शवत आहेत. हेही वाचा -  ‘हा खूप स्वार्थी निर्णय…’; आई बनल्यानंतर सोनम कपूरची पहिली प्रतिक्रिया दरम्यान, द कपिल शर्मा शोबद्दल अशीही माहिती समोर आली आहे की कॉमेडियन भारती सिंग नवीन सीझनमध्ये दिसणार नाही तर सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, कृष्णा अभिषेक चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरण सिंग यांच्यासह संपूर्ण टीम शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय शोमध्ये 4 नवीन सदस्यही पाहता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या