JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत लवकरच करणार लग्न, फॅमिली प्लॅनिंगवर केला खुलासा

बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत लवकरच करणार लग्न, फॅमिली प्लॅनिंगवर केला खुलासा

बी टाऊनची ड्रामा क्वीन कंगना रणौतने लवकरच लग्नबंधनात (Kangana Ranaut wedding)अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत.

जाहिरात

Kangana Ranaut

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: बी टाऊनची ड्रामा क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut ) नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित सन्मान स्वीकारल्यानंतर तिने सर्वांचे आभार मानले. यासोबतच तिने लग्न, (Kangana Ranaut wedding)फॅमिली प्लॅनिंगसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. कंगना रणौत प्रेमात आहे. अभिनेत्री कंगनाने नुकताच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. ‘क्वीन’ स्टारने असेही जोडले की तिने स्वत: ला, विवाहित आणि पुढील पाच वर्षांत मुले झाल्याचे पाहिले. कंगनाने केलेल्या या भाष्यामुळे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत. कंगनाने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला निश्चितपणे लग्न करायचे आहे आणि मला मुले हवी आहेत. मी स्वत:ला पाच वर्षांनतर पत्नी आणि आईच्या रूपात पाहते. तसेच नवीन भारताच्या व्हिजनमध्ये सक्रियपणे सहभागी होणारी व्यक्ती म्हणून पाहते. कंगना एका मुलाखतीत असेही विचारण्यात आले होते की, ती पाच वर्षांत आई आणि पत्नी बनण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे का? कंगनाने हसून उत्तर दिले, “हो.” त्यानंतर कंगनाला तिच्या जोडीदाराविषयी विचारण्यात आले आणि ती म्हणाली, तुम्हाला लवकरच कळेल. जेव्हा तिला विचारले की तू नातेसंबंधात आनंदी आहेत का, तेव्हा ती म्हणाला, “हो, नक्कीच,” मात्र तिने अधिक प्रतिक्रिया देण्यास टाळले. आणि तुम्हाला लवकरच कळेल. असे म्हटले आहे. कंगनाच्या या प्रतिक्रियेमुळे बी टाऊनमध्ये तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. यासोबतच तिने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले. ‘‘खूप पूर्वी जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती….एक प्रश्न मला सतावत होता…मी स्वतःला विचारले होते की काहींना पैसे हवे आहेत, काहींना चाहते हवे आहेत… . काहींना प्रसिद्धी हवी असते तर काहींना फक्त लक्ष हवे असते…. मला काय हवे आहे? एक मुलगी म्हणून मला नेहमीच माहित होते की मला आदर मिळवायचा आहे आणि तो माझा खजिना आहे. या भेटवस्तूबद्दल भारताचे आभार.” असे तिने म्हटले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दला बोलायचे झाले तर ती पुढे ‘धाकड’ मध्ये दिसणार आहे. ज्यात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, ती ‘तेजस’ चा देखील एक भाग आहे जिथे ती हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या