JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kabir Singh Review : सिनेमा पाहायला जाण्याआधी जाणून घ्या कसा आहे 'कबीर सिंग'

Kabir Singh Review : सिनेमा पाहायला जाण्याआधी जाणून घ्या कसा आहे 'कबीर सिंग'

या सिनेमात शाहिदनं साकारलेल्या प्रेमात वेडेपणाचा कळस गाठणाऱ्या ‘कबीर सिंग’ची तरुणाईमध्ये जास्त क्रेझ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘Kabir Singh’ हा बहुचर्चित सिनेमा 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शिन संदिप वांगा यांनी केलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज लावला जात आहे. मागच्या काळात आलेले शाहिद कपूरचे बरेच सिनेमे जेमतेम चालले. मात्र कबीर सिंह ही एका अशा प्रियकराची कथा आहे जो प्रेमात हरल्यानंतर स्वतःला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रेमातल्या वेडेपणाचा कळस गाठलेल्या या सिनेमातील शाहिद कपूरची तरुणाईमध्ये जास्त क्रेझ आहे.  त्यामुळे या सिनेमाकडून शाहिदला बऱ्याच अपेक्षा आहेत. अशातच आता या सिनेमावरील पहिली वहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दयाबेनचं इंग्लिश ऐकून बीग बींचाही उडाला गोंधळ, पाहा तुम्हाला तरी समजतं का?

प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट करत शाहिद कपूरच्या या सिनेमावरील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं, शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा प्रेक्षकांनी आवर्जुन पाहावा असा सिनेमा आहे. शाहिदनं या सिनेमामध्ये आत्तापर्यंतचा त्याचा सर्वात चांगला परफॉर्मन्स दिला आहे. कियारा अडवाणीनं सुद्धा या सिनेमामध्ये कमालीचा अभिनय केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावेल. संदिप वांगा यांनी सुद्धा खूप चांगलं दिग्ददर्शन केलं आहे.’ कपिल शर्मासोबत काम केलेल्या या छोट्या कॉमेडियनला तुम्ही ओळखलं का ?

शाहिद कपूरन या अगोदर उडता पंजाब, कमीने, हैदर यांसारख्या सिनेमामध्ये कबीर सिंह सारख्या भूमिका साकारल्या आहेत. ज्यात त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं आहे. शाहिदनं साकारलेली ‘कबीर सिंह’ ही भूमिका अग्रेसिव्ह, लाउड आणि स्ट्रॉन्ग दाखवण्यात आली आहे. त्याचा रफ लुक, प्रेमातील वेडेपणा हे सर्व मोठ्या पडद्यावर पाहणं अजूनच मजेदार असणार आहे.

जाहिरात

कबीर सिंह हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा साउथमध्ये सुपरहिट ठरल्यानंतर संदिप वांगा यांनी या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचं ठरवलं. त्यामुळे मूळ तेलुगू सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंह’ यांच्यात काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ============================================================= VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या