मुंबई, 24 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची मुख्य भूमिका असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, एका याचिकेमुळे चित्रपद प्रदर्शनावर टांगती तलवार आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीदरम्यान आज एक वेगळी घटना न्यायालयात पाहायला मिळाली. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी (Justice Indira Banerjee) यांनी एका 14 वर्षांच्या मुलीची कहाणी कोर्टात सांगितली, जी तिने स्वत: त्यांच्यासोबत शेअर केली होती. कथा सांगताना त्या स्वतः खूप भावूक झाल्या होत्या. न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी सांगितले की, त्या अनेक वर्षांपासून लीगल एड सोसायटीचा भाग आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश असताना त्या कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळची ही घटना आहे. न्यायमूर्तींनी सांगितली मुलीची व्यथा न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी न्यायालयात सांगितले की, ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा मला वेश्याव्यवसायात ढकललेल्या एका महिलेबद्दल माहिती मिळाली. आजही जेव्हा मी तिच्याबद्दल विचार करते तेव्हा मी अस्वस्थ होते. ती 14 वर्षांची मुलगी होती. कुटुंबात कोणीच नव्हते. तिला दोन वेळचे अन्नही मिळत नव्हते. तिच्या शेजारी राहणारी बाई होती, जिला लोक मावशी म्हणायचे, तिच मुलीची काळजी घ्यायची. एके दिवशी त्या मावशीने तिला मुंबईला यायला सांगितले. येथे तुला नोकरी, जेवण सर्व काही मिळेल. गरिबीतून सुटका आणि कामाचा विचार करून तिने मुंबईला जाण्याचे मान्य केले. तिथे गेल्यावर ती एका दुष्टचक्रात अडकली. मावशीच्या जाळ्यात अडल्यानंतर अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला. दररोज तिला अनेक लोकांचे समाधान करावे लागत होते. एके रात्री तर अनेकांनी तरुणीवर असुरक्षित बलात्कार केला. ती खूप रडली, ओरडली. शेवटी एके रात्री आलेल्या एका माणसाला तिच्या गरीब स्थितीची दया आली. त्यांनी त्या असहाय मुलीची तिथून सुटका करून एका एनजीओकडे सोपवली. नंतर त्या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने प्रसारमाध्यमांनी तिचा मुद्दा उपस्थित केला. माझ्याशी लग्न करणार का?’, अभिनेत्रीनं पोस्ट व्हायरल होताच केली Delete न्यायमूर्ती बॅनर्जी म्हणाल्या की, आजही तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा विचार करून माझा थरकाप होतो. एका रात्रीत तिने अनुभवलेल्या नरकामुळे ती मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली. जेव्हा मी तिला भेटले तेव्हा तिने माझा हात असाच धरला आणि विचारले मी काय केलं होतं? माझा काय दोष होता? हे वाक्य बोलत असताना न्यायमूर्ती बॅनर्जी खूप भावूक आणि गंभीर झाल्या. कोर्ट रूमचे वातावरणही गंभीर बनले. जेव्हा त्या ही गोष्ट सांगत होत्या तेव्हा न्यायालयात स्मशानशांतात पसरली होती. भन्साळी प्रॉडक्शन्सतर्फे ज्येष्ठ वकील आर्यमा सुंदरम यांनी हजेरी लावत “माय लेडीशिप! म्हटले तेव्हा शांतता भंग पावली, हे प्रकरण तसे नाही. येथे त्या पीडित महिलेच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट त्यांची बदनामी करत नाही, तर त्यांच्या धाडसाचा आणि आत्मविश्वासाचा गौरव करतो. ही एका सेक्स वर्करची सन्माननीय कथा आहे, जी राजकीयदृष्ट्या प्रसिद्ध झाली आहे. ‘रात्री 3 वाजता डिलिट करतोय घाणेरड्या कमेंट्स’,अश्नीर ग्रोव्हर यांची प्रतिक्रिया Gangubai Kathiawadi नाव बदलता येईल का? सुप्रीम कोर्टाचा प्रश्न या चित्रपटावर प्रश्न उपस्थित करून त्याला वादात ओढले जात आहे. तेही या चित्रपटातील नायिकेचे खरे व्यक्तिमत्व, म्हणजेच खऱ्या गंगुबाई काठियावाडीचा दत्तक मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या एका दावेदाराने, पण याचा कोणताही पुरावा तो देत नाही. याच युक्तिवादावर न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळून लावली. मात्र, कोर्ट उठल्यानंतरही वकिलांनी त्यांच्या मनात रुजलेल्या गोष्टीवर चर्चा सुरूच ठेवली.