मुंबई, 27 नोव्हेंबर- कौन बनेगा करोडपती 13 (Kaun Banega Crorepati 13) या शोच्या माध्यमातून अनेक जण आपल्या ज्ञानाच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करतात. दर शुक्रवारी `शानदार शुक्रवार` हा खास एपिसोड प्रसारित होतो. या एपिसोडमध्ये सेलेब्रिटी येतात आणि गेम खेळतात. तसेच प्रेक्षकांशी त्यांच्याविषयी माहिती नसलेल्या गोष्टी शेअर करतात. या शोमध्ये पाहुणे म्हणून सहभागी झालेले सेलेब्रिटी जी रक्कम जिंकतात ती चांगल्या कामांसाठी खर्च करतात. या शुक्रवारी (26 नोव्हेंबर) `सत्यमेव जयते 2` या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham), अभिनेत्री दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) आणि निर्माता निखिल अडवाणी या शोमध्ये सहभागी झाले होते. या वेळी जॉन आणि शोचं सूत्रसंचालन करणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात जॉनचं फुटबॉल स्किल आणि बाइक्सविषयी भरपूर चर्चा झाली. जॉन अब्राहम त्याचा फिटनेस (Fitness) आणि अॅक्शनसाठी (Action) चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कौन बनेगा करोडपती 13 मध्ये सहभागी झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी त्याच्याशी संवाद साधला. `मी बाइक चालवायला घाबरतो,` असा धक्कादायक खुलासा त्या वेळी बिग बी (Big B) यांनी केला. जेव्हा अमिताभ म्हणाले होते, की अभिषेकला चिडवू नको
- हॉटसीटवर बसलेला जॉन अब्राहम आणि दिव्याला अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला. त्यानंतर जॉनशी बाइक्सविषयी गप्पा रंगल्या. या वेळी जॉननं सांगितलं, की `धूम चित्रपटावेळी मी नवी बाइक घेऊन तुमच्या घरी आलो होतो. त्या वेळी तुम्ही ‘अभिषेकला चिडवू नको’ असं सांगितलं होतं. परंतु, अभिषेक खाली येतातच तुम्ही ‘व्वा… काय बाइक आहे,’ असं म्हणाला होतात.’ बिग बी यांना वाटते बाइकची भिती- यानंतर बिग बी यांनी बाइकची भिती वाटत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, की `जॉन, का माहिती नाही, पण मला बाइकची खूप भीती वाटते. तुम्ही बाइक कशी चालवता हे मला माहीत नाही.` बिग बी याचं हे म्हणणं ऐकल्यावर जॉन म्हणाला, की `बाइक नेहमी सावकाश आणि हेल्मेट (Helmet) घालून चालवावी. कारण सुरक्षा गरजेची असून, कायद्याचं पालन करणंही आवश्यक आहे.` स्वतः करतो बाइकची स्वच्छता - या वेळी जॉन म्हणाला, ‘माझ्याकडं 18 बाइक्स आहेत आणि मी त्या अतिशय काळजीपूर्वक वापरतो. माझ्याकडे यापूर्वी याहूनही जास्त बाइक्स होत्या. मी दर आठवड्याला बाइक्स स्वच्छ करतो. गॅरेजमध्ये एसी सुरू करून मी बाइकचा प्रत्येक टायर (Tyre) स्वच्छ करतो. प्रत्येक टायरला शाम्पू लावतो आणि तो काळजीपूर्वक स्वच्छ करतो. जेव्हा एखादी बाइक चालवून घरी परततो तेव्हा ती पुन्हा स्वच्छ करतो.’ (हे वाचा:
ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली रजनीकांत यांची शेजारी; खरेदी केलं कोट्यावधींचं घर
) जॉनला आवडते बाइकवरून नाइट राइड- ‘तुला बाहेर फिरायला कधी आवडतं,’ असं बिग बी यांनी विचारलं असता, जॉन म्हणाला, की ‘मला रात्रीच्या वेळी फिरायला आवडतं. परंतु, मी बाइक योग्य वेगातच चालवतो. मी नेहमी बाइक हळू चालवतो.’ सिग्नलवर मुलं म्हणाली होती, की `स्वतःला जॉन अब्राहम समजतोस का?` जॉननं गाडी चालवतेवेळी घडलेली एक घटनाही या वेळी सांगितली. तो म्हणाला, की `एकदा मी हेल्मेट घालून सिग्नलवर थांबलो होतो. त्या वेळी कॉलेजचे काही तरुण माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, की `तू स्वतःला जॉन अब्राहम समजतोस का?``