मुंबई, 13 नोव्हेंबर- टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) कृतिका सेंगर (Kratika Sengar) आणि निकितिन धीर (Nikitan Dheer) यांच्या घरी ज्युनियर धीर येणार आहे. या गुड न्यूजची (Good News) माहिती स्वतः कृतिकाने सोशल मीडियावर दिली आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे आणि महाभारतात कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर, निकितन आणि कृतिका यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे.कारण अभिनेते पंकज आजोबा होणार आहेत.तर कृतिका आणि निकितन आईबाबा होणार आहेत. कृतिकाने पती निकितनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही गुड न्यूज दिली आहे. तर चाहते आणि सेलिब्रिटीही त्यांचं अभिनंदन करत आहेत.
कृतिका सेंगरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. कृतिकाने निकितन धीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘धीर ज्युनियर 2022 मध्ये येणार आहे. हर हर महादेव ओम’. या पोस्टवर बॉलिवूड आणि टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्री तिचं अभिनंदन करत आहेत. अनिता राज, अंकिता लोखंडे, गौहर खान, किश्वर मर्चंट, स्मृती खन्ना, अक्षरा सिंग, रिद्धिमा पंडित यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कृतिका आणि निकितनचे अभिनंदन केले आहे. कृतिका सेंगरने शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत. ‘राणी लक्ष्मीबाई’ची भूमिकेसाठी कृतिका सेंगरला खूप वाह-वाह मिळाली होती. तिने ‘पुनर्विवाह’, ‘कसम तेरे प्यार की’, ‘छोटी सरदारनी’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तर पती अभिनेता निकितन धीर हे सुप्रसिद्ध कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक पंकज धीर यांचे पुत्र आहेत. निकितन ‘दबंग 2’, ‘रेड्डी’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. पण निकितनला शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’मधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात खलनायक थंगबलीची भूमिका साकारून निकितनं खूप लोकप्रियता मिळवली होती.निकितन आणि कृतिका यांचे २०१४ साली लग्न झाले होते. आता दोघेही आई-बाबा होणार आहेत. कृतिका सेंगरचे सासरे आणि निकितन धीरचे वडील पंकज धीर ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात. पंकजने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले असले तरी त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतील कर्णाच्या भूमिकेतून मिळाली होती.