Jethalal aka Dilip Joshi news: जेठालाल ही भूमिका गेली 14 वर्ष साकारणारा अभिनेता दिलीप जोशीचा 26 मे रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या काही exclusive गोष्टी
दिलीप जोशीच्या एका थ्रोबॅक फोटो मध्ये तो एका अनोख्या लुकमध्ये दिसत आहे. 'खेलैया' नाटक सुरु होण्याआधी पृथ्वी थिएटर इथे काढलेला हा फोटो आहे.
दिलीपला कदाचित सगळ्यांनी ओळखलं नसेल पण दिलीप जोशीने हम आपके है कौन या ब्लॉकबस्टर चित्रपटात भोला हे पात्र साकारलं होतं. भोला आपल्या शकुंतलाच्या शोधात असतो असा एक फेमस सीन सुद्धा या चित्रपटात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दिलीपची नेटवर्थ तब्ब्ल 40 कोटींच्या घरात असून तारक मेहताच्या दर एपिसोडचे दिलीप जवळपास 1.5 लाख रुपये घेतो. त्याचं गोरेगावात आलिशान घरसुद्धा आहे.
दिलीप जोशी गेली 14 वर्ष जेठालाल चम्पकलाल गडा हे पात्र साकारत असून त्याच्या या भूमिकेने घराघरात त्याला न पुसता येणारी ओळख निर्माण केली आहे.
दिलीपने याआधी क्या बात है, दो और दो पांच, हम सब बाराती, डाल में काला अश्या मालिकांमधून काम केलं आहे.
मागे कधीतरी तारक मेहता या चौदा वर्ष अखंड चालू असणाऱ्या मालिकेतून दिलीप एक्झिट घेणार अशी बातमी आली होती. पण दिलीपने या शक्यता नाकारल्या आहेत.