JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रिक्षा चालवताना दिसला 'जीव माझा गुंतला'तील मल्हार; का ओढावली अशी वेळ?

रिक्षा चालवताना दिसला 'जीव माझा गुंतला'तील मल्हार; का ओढावली अशी वेळ?

जीव माझा गुंतला मालिकेत अंतराला संकटात टाकणारा मल्हार (malahar drive humsufer ) आता तिला संकटातून बाहेर काढण्सासाठी तिच्या हमसफरची मदत घेणार का..असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पडतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी- कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला  (jeev majha guntala) मालिका कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायला यशस्वी झाली आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. या दोघांच्यात भांडणात देखील यांच्यातील प्रेम दिसते. आता मालिका एका वेगळ्य वळणावर आहे. नेहमी अंतराला संकटात टाकणारा मल्हार  (malahar drive humsufer ) आता पती म्हणून तिची मदत करणार का? अंतराला जेलमधून बाहेर काढण्यासाठी शेवटी तिच्या हमसफर म्हणजे रिक्षाची मदत घेणार का..असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. राजश्री मराठीने नुकताच मल्हारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो अंतराची रिक्षा म्हणजे हमसफर चालवताना दिसत आहे. नेमकी त्याच्यावर रिक्षा चालवणयाची का वेळ आली हे येणाऱ्या भागातच समजणार आहे. शिवाय हीच हमसफर अंतराला जेलमधून बाहेर काढण्यास मदत करणार का याचा देखील लवकरच उलगडा होणार आहे. वाचा- बिग बॉस मराठीची बी टीम दिसली एकत्र ; निमित्त खास मात्र 1 सदस्य मिसिंग… अंतराला चित्राकाकीने ड्रग्सच्या केसमध्ये अडकवले आहे. यामुळे सध्या ती जेलमध्ये आहे. मात्र तिच्या जेलमध्ये जाण्यामुळे कदाचित अंतरा आणि मल्हारच्या नात्यात प्रेम फुलण्याची शक्यता आहे. कारण काही काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रोमोमध्ये मल्हारने अंतराला शब्द दिला जेव्हा बाजू सत्याची असते तेव्हा शंकेला जागा नसते. अशावेळी तुला निर्दोष सोडवणे आता माझी जबाबदारी असल्याचे तो म्हणाला आहे. आत हमसफरच्या मदतीने कदाचित तो तिला यातून बाहेर काढेल. वाचा- ‘आई कुठे काय करते’ मधून गायब असणारी Arundhati Is Back मल्हार मात्र रिक्षा चालवताना फुलटू धमाल करताना दिसला. नेहमी रिक्षवरून अंतराला सुनावणार मल्हार रिक्षा चालवताना आनंदी दिसला. शिवाय शुटींग दरम्यान त्याला रिक्षा चालवताना पाहून रस्त्यावर लोकांनी गर्दी देखील केली होती. अनेकदा अंतरा आणि मल्हार कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरताना दिसत असतात. सोशल मीडियावर देखील दोघे प्रचंड सक्रिय असतात. एकमेकांसोबत भन्नाट रील शेअर करत असतात.

संबंधित बातम्या

येऊन पोहचली आहे. अंतरा मोठ्या संकटात अडकली असून या सगळ्यामध्ये तिला मल्हारची साथ मिळणार आहे. लग्नानंतर अंतराशी भांडणार, तिच्यावर तितकासा विश्वास नसणार मल्हार आता अंतराच्या बाजूने लढताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या प्रवासात मल्हारला मिळाली आहे नवी “हमसफर”. अंतरा आणि अंतराची हमसफर आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेच. पण आता मल्हारदेखील हमसफर चालवताना मालिकेमध्ये दिसणार आहे. त्याच सीनचे शूटिंग सुरू असताना काढलेले काही फोटोज… आता मल्हारने हमसफरची मदत का घेतली? नक्की काय झालं ? हे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या