मुंबई, 26 फेब्रुवारी- एखाद्या कलाकारा इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त स्टार किड्सचीसुद्धा (Star Kids) चर्चा होत असते. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सनी पदार्पण केलं आहे. तर काही पदार्पणाच्या तयारीत आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण (Janhavi Kapoors Sister) खुशी कपूर (Khushi Kapoor) ही, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. जोया अख्तर दिग्दर्शित ‘आर्चीज’च्या हिंदी रिमेकमध्ये (Archies Hindi Remake) हे तिघे स्टारकिड्स एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तथापि, या तिन्ही स्टार किड्स आणि चित्रपट निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.परंतु, बोनी कपूर यांनी खुलासा करत सांगितलं आहे की, ‘खुशी कपूर यावर्षी एप्रिलमध्ये तिच्या पहिल्या प्रोजेक्टचं शूटिंग करणार आहे. यापूर्वी बोनी यांनी खुलासा केला होता की जान्हवीप्रमाणेच खुशीलादेखील अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. खुशीची सोशल मीडियावर आधीपासूनच जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. आता, निर्मात्यांनी स्वतः खुलासा केला आहे की खुशी या उन्हाळ्यात आपल्या पहिल्या चित्रपटासाठी शूट करणार आहे.
इंडिया टुडेशी बोलताना बोनी कपूर म्हणाले, “ख़ुशी एप्रिलमध्ये तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे. याबाबत आत्ता अधिक सांगू शकत नाही. तुम्हाला लवकरच त्याबद्दल अधिक माहिती मिळेल. वडील म्हणून मी अर्जुन कपूरसोबत हेच करतो आणि जान्हवी आणि खुशीसोबतही तेच करेन.जिथंपर्यंत अर्जुन आणि जान्हवीचा विषय आहे, त्यांनी आधीच स्वतःसाठी खूप चांगलं केलं आहे. आणि करत आहेत.” (हे वाचा: हृतिक रोशनने रुमर्ड गर्लफ्रेंड सबा आझादसाठी पहिल्यांदाच लिहिली Insta पोस्ट ) यापूर्वी बोनी कपूर म्हणाले होते की, ते खुशी कपूरला लॉन्च करणार नाहीत. त्यांनी गेल्या वर्षी बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगितले होते की, “त्त्यांच्या मुलीला इतर कुणीतरी लॉन्च करावं, कारण ते तिचे वडीलआहे.”बोनी कपूर यांनी नेहमीच आपल्या सर्व मुलांना सपोर्ट केला आहे. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा हक्क दिला आहे. सोबतच त्यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की, मी त्यांना सर्व व्यवसायिक बाजूंची एडेल त्याठिकाणी गोष्टी समजावून देण्याचा प्रयत्न करत असतो, बाकी ते सक्षम आहेत. शेवटी निर्णय त्यांच्यावर असतो’.