jacqueline fernandez
मुंबई,14 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज दिल्लीत चौकशीसाठी हजर झाली आहे. दिल्लीतील मंदिर मार्गावर स्थित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात अभिनेत्रीची चौकशी होत आहे. सायंकाळपर्यंतही चौकशी करण्यात येणार आहे.यापूर्वी अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी झाली होती. जवळजवळ सहा तास ही चौकशी चालली होती. त्यानंतर आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली जात आहे. जॅकलिन फर्नांडिसची ही चौकशी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केली जात आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरने 200 कोटींचा गंडा लावल्याचा आरोप आहे. त्याने फोर्टेस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला होता. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव प्रामुख्याने पुढं आलं होतं. त्यानंतर सतत या दोघींची चौकशी होत असते. दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेशचे अनेक खाजगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये सुकेश आणि जॅकलिनची जवळीकता पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासेदेखील झाले होते. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं होतं. इतकंच न्हे तर आपल्या एका सुपरहिरोवर आधारित चित्रपटात जॅकलिनला त्याने मुख्य भूमिकेत घेण्याचं आश्वासनही दिल्याचं समोर आलं होतं. **(हे वाचा:** जॅकलीननंतर सुकेशमुळे आणखी एक अभिनेत्री अडचणीत, मनी लाँड्रिंग प्रकरणात 6 तास चौकशी ) नोरा फतेहीची चौकशी- मनी लॉन्ड्रींग प्रकरणात यापूर्वी अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची तब्बल 6 तास चौकशी केली आहे.