JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 200 कोटी प्रकरणात Jacqueline Fernandez ला पुन्हा समन्स; आधी दोन्ही वेळस गैरहजर

200 कोटी प्रकरणात Jacqueline Fernandez ला पुन्हा समन्स; आधी दोन्ही वेळस गैरहजर

गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

जाहिरात

जॅकलिन फर्नाडिस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सतत चर्चेत असते. गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच या मनीलाँड्रिंग प्रकरणात तपास एजंसीनं दुसरी सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली होती. सोमवारी दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनची चौकशी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली. अशातच याप्रकरणाविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिल्ली EOW ने 200 कोटींहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तिसरे समन्स बजविले आहे. यावेळी जॅकलीनला 14 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ती तिच्या काही वैयक्तिक कामामुळे आज या कारवाईत सहभागी होऊ शकली नाही. त्यामुळे तिला आता 14 तारखेचा नवीन समन्स पाठवण्यात आला आहे. हेही वाचा -  Farmani naaz : हर हर शंभो गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या गायिकेने थेट गायलं ‘चढती जवानी’; व्हिडीओ तुफान व्हायरल या प्रकरणाचा तपास करत असून सुकेशने काही मालमत्ता खरेदी केली होती की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच त्याने खरेदी केलेल्या मालमत्तेत गुंतवलेले पैसे गुन्हेगारी संबंधीत आहे की नाही याचाही तपास सुरु आहे. दरम्यान, जॅकलीनचे वकिल प्रशांत पाटील यांनी म्हटलं होतं की, सुकेश चंद्रशेखर प्रकरणी माझी क्लायंट जॅकलीननं संपूर्ण सहकार्य केलं आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक चौकशीत जॅकलीननं सहभाग नोंदवला आहे. तिच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तीनं तपास यंत्रणेला दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या