JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...म्हणून जॅकी श्रॉफ यांना घालावी लागली होती गर्लफ्रेंडची अंडरवेअर, म्हणाले- एकदम फिट था!

...म्हणून जॅकी श्रॉफ यांना घालावी लागली होती गर्लफ्रेंडची अंडरवेअर, म्हणाले- एकदम फिट था!

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) 1 फेब्रुवारी रोजी त्याचा 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजघडीला त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आणि प्रसिद्धी आहे. पण, एक काळ असा होता, जेव्हा ते मुंबईतील तीन बत्ती येथील चाळीत राहायचा. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्ता एक मजेशीर किस्सा व्हायरल होताना दिसत आहे.

जाहिरात

Jackie Shroff

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) 1 फेब्रुवारी रोजी त्याचा 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याचे खरे नाव जय किशन काकूभाई श्रॉफ आहे. आजघडीला त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आणि प्रसिद्धी आहे. पण, एक काळ असा होता, जेव्हा ते मुंबईतील तीन बत्ती येथील चाळीत राहायचा. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्ता एक मजेशीर किस्सा व्हायरल होताना दिसत आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तो किस्सा स्वतःच सांगितला. एका फोटोशूटसाठी त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडकडे तिची बिकनी मागावी लागली होती. मी तीन बत्ती चाळचा गरीब होतो. माझ्याकडे स्विमिंग ट्रंक नव्हती. मला फोटोशूटसाठी याची गरज होती. मला आयेशाला तिच्या टू-पीस बिकिनीतून अंडरवेअर मागवायचे होते. त्यावेळी आयशा माझी गर्लफ्रेंड होती. तिची अंडरवेअर मला परफेक्ट बसली. मला यात कोणतीही लाज वाटली नाही, पण अभिमान आहे. असा किस्सा त्यांनी एका माध्यमांशी बोलताना शेअर केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी कृष्णा श्रॉफच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मजेशीर गोष्ट म्हणजे, एकदा जॅकी यांनी त्यांच्या आणि कृष्णाच्या फोटोचा कोलाजही पोस्ट केला होता. यामध्ये ते स्विमिंग पूलच्या काठावर पडून होता. विशेष म्हणजे कृष्णाही त्याच पोजमध्ये पाहायला मिळते.

आयशा 13 वर्षांची असताना जॅकीने तिला स्कूल बसमध्ये जाताना पाहिले. त्यानंतर तो तिला भेटला आणि स्वतःची ओळख करून दिली. अशातच दोघांची पहिली भेट झाली. यानंतर दोघे एका रेकॉर्ड शॉपमध्ये भेटले. दोघांनी 5 जून 1987 रोजी लग्न केले त्यांना कृष्णा आणि टायगर श्रॉफ अशी दोन मुलं आहेत. प्रत्येक कठीण प्रसंगात आयेशाने जॅकीची साथ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या