Jackie Shroff
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बॉलिवूडचे असे हिरो आहेत, जे सतत विना ब्रेक चित्रपट करत आहेत. साधारण कुटुंबातील जॅकी श्रॉफचा सुपरस्टार बनण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. पण त्यांनी एक उदाहरण दाखवून दिलं आहे की, कशी बॉलिवूडमध्ये स्वप्नं पूर्ण होतात? जॅकी श्रॉफचं लहानपण खूप गरीबीमध्ये गेलं. आज जॅकी श्रॉफ 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. एकूणच हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, त्यांचं स्वतःचं आयुष्यही खूप फिल्मी राहिलं आहे. चाळीत राहत होते जॅकी श्रॉफ जॅकी श्रॉफ मुंबईतील चाळीत राहत होते. जॅकी श्रॉफना त्यांच्या भागातील लोकं ‘जग्गू दादा’ म्हणून हाक मारत असत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं होतं. चित्रपटात येण्याआधी त्यांनी अनेक कामांमध्ये नशीब आजमावलं. पण नशीबाला काही औरच मंजूर होतं. जॅकी यांनी कूकपासून फ्लाईट अटेंडंटपर्यंत सर्व काही करण्याचा प्रयत्न केला होता. एक दिवस जॅकी बस स्टँडवर बस येण्याची वाट पाहत होते. तेव्हा एक माणूस जवळ आला आणि म्हणाला, ‘मॉडेलिंग करशील?’ तोपर्यंत जॅकी यांची कमाई काहीच नव्हती, ते लगेच म्हणाले की, ‘पैसे देणार का?’, यानंतर अगदी एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील हिरोप्रमाणे त्यांचं आयुष्यचं बदललं. रातोरात मिळालं स्टारपद जॅकी यांचं व्यक्तिमत्त्वचं असं आहे की, त्यांनी ‘हीरो’ चित्रपटातून करिअरला सुरूवात केली आणि रातोरात सुपरस्टार पद मिळवलं. पण सुपरस्टार बनल्यावरही बराच काळ जॅकी चाळीत राहत होते. जॅकी यांचं चांगलंच फॅन फॉलोइंग होतं. असं म्हणतात की, त्यांना चित्रपटात घेण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांची त्यांच्या घराबाहेर रांग लागत असे. जॅकी श्रॉफ यांना एवढी मागणी होती की, जर ते वॉशरूममध्ये असले तर निर्माता-दिग्दर्शक टॉयलेटच्या बाहेर उभं राहून त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी वाट पाहत असत. गरीबांची करतात मदत मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकी श्रॉफ गरीबांची मदत करण्यासाठीही ओळखले जातात. एवढंच नाहीतर नानावटी हॉस्पिटलमध्ये गरीबांसाठी त्यांचं एक खास खातं आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये जॅकी यांचा खासगी फोन नंबरही लोकांकाडे असतो, म्हणजे जेव्हा कोणाला गरज लागेल तेव्हा थेट त्यांना कॉल करता येईल. वृक्षारोपणासाठीही जॅकी लोकांना प्रेरित करतात. काँट्रोव्हर्सी किंग जॅकी जॅकी श्रॉफ जितके मोठे आणि प्रसिद्ध सुपरस्टार आहेत, तितकेच वादग्रस्त राहिले आहेत. 1986 मध्ये जॅकी यांच्यावर चित्रपट अभिनेत्री तब्बूची छेडछाड करण्याचा आरोप लागला होता. तेव्हा तब्बू खूपच कमी वयाची होती आणि तिची बहीण फराह जॅकीसोबत चित्रपटात काम करत होती. फराहनेच या गोष्टीचा खुलासा केला होता. तब्बूने कधीच जॅकीसोबत काम केलं नाही. प्रत्येक स्टारच्या आयुष्यात चढ-उतार आणि काँट्रोव्हर्सीज असतातच. पण तरीही फॅन्सच्या मनातलं त्यांचं ‘हिरो’चं स्थान कायम असतं. जग्गू दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.