मलायका अरोरा, सुश्मिता सेन ते दिशा पाटनी, कतरिना बॉलिवूडच्या या अभिनेत्री सर्वाना देतायत फिटनेस गोल्स, पाहा फोटो
मलायका अरोरा कायम तिच्या फिटनेस मुळे चर्चेत असते. ती योगसिद्धीत प्रवीण आहे. अवघड योगासनं सहजी करते आणि ऑनलाइन धडेसुद्धा देते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी Fitness freak आहे. निरोगी राहण्यासाठी ती योगा करते. ती वारंवार तिच्या सोशल मीडियावर फिटनेस संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ शेयर करत असते
Miss Universe सुश्मिता सेन फिट राहण्यासाठी योग करते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांना योगासनं करण्यास आणि निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यास प्रेरित करते
मूळची श्रीलंकन जॅकलिन फर्नांडिस Fitness Freak आहे. ती तिचे योगासनांनचे फोटो कायम सोशल मीडियावर शेयर करत असते.
आपल्या Dance Movesने सर्वांनां मंत्रमुग्ध करणारी दिशा पाटनी स्वतःच्या तंदुरुस्तीला सर्वात जास्त महत्व देते.
परिणीती चोप्रा तिच्या Physical fitness कडे खूप लक्ष देते. अलीकडेच, तिने तिचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला.