आयफा सोहळ्याकडे (IIFA awards) गेले बरेच दिवस अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. नामांकनाची यादी जाहीर झाल्यापासूनच कोणाला अवॉर्ड मिळेल याची उत्सुकता लागली होती. आयफा सोहळ्यातील विजेत्यांची यादी पाहा या फोटोगॅलरीत.
सध्या सगळीकडे IIFA 2022 पुरस्कार सोहळ्याची चर्चा होत आहे. यात कोण परफॉर्म करणर आणि कोणाला अवॉर्ड मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून जुबिन नौटियालने आयफा अवॉर्ड घरी नेण्याचा मान मिळवला. रातां लंबिया गाण्यासाठी त्याला हे पारितोषिक मिळालं
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी विभागून पुरस्कार देण्यात आला. ए आर रहमान यांच्यासह तनिश बागची, जसलीन रॉय, जावेद मोहसीन, विक्रम मोन्ट्रॉस, बी प्राक, जानी यांना पुरस्कार मिळाला
सुनील शेट्टी यांचा मुलगा आहान शेट्टी याला आयफा अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू मेलचा पुरस्कार वडलांच्या हस्ते मिळाला
अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं
तर अभिनेत्री सई ताम्हणकरने सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावत मराठीचा झेंडा पार दुबईमध्ये फडकवला
विकी कौशलने सर्वोकृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर स्वतःच नाव कोरलं. त्याच्या सरदार उद्धम चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हे पारितोषिक त्याला मिळालं.
बॉलिवूडच्या परम सुंदरीला अर्थात अभिनेत्री क्रिती सॅनोनला मिमी चित्रपटातील अप्रतिम कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला