JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विराटची टीम इंडिया झाली सलमान-कतरिनाची फॅन, WORLD CUP सुरू असतानाही पाहिला 'भारत'

विराटची टीम इंडिया झाली सलमान-कतरिनाची फॅन, WORLD CUP सुरू असतानाही पाहिला 'भारत'

सलमान खाननं ट्विटर वरून टीम इंडियासाठी खास मेसेज लिहून त्यांचे आभार मानले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘भारत’नं अवघ्या 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा गल्ला पार करत नवे विक्रम रचले. फक्त भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची क्रेझ दिसून येतेय. अशातच वर्ल्ड कप सुरू असतानाही टीम इंडियाला हा सिनेमा पाहायचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी वर्ल्डकपच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत नॉटिंगहॅममध्ये हा सिनेमा पाहिला. यावेळचा एक फोटो केदार जाधवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

टीम इंडियानं ‘भारत’ सिनेमा पाहिल्यावर केदार जाधवनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोला, ‘भारत की टीम ‘भारत’ मुव्ही के बाद’ असं कॅप्शन दिलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यानंतर सलमान खाननं ट्विटर वरून टीम इंडियासाठी खास मेसेज लिहून त्यांचे आभार मानले. सलमाननं लिहिलं, ‘धन्यवाद भारत टीम परदेशात असूनही ‘भारत’ पाहिल्या बद्दल. पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण भारत तुमच्या सोबत आहे.’ यासोबतच त्यानं BharatJeetega असा हॅशटॅगही वापरला.

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याला पुढील 3 आठवड्यांपर्यंत कोणताही सामना खेळता येणार नाही. मात्र शिखरच्या जागेवर संघात कोणाला जागा मिळाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. भारताचा पुढील सामना उद्या (गुरूवार 13 जून) न्यूझीलंडसोबत होणार आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या