JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी World Cup 2019 | KL Rahul | Athiya Shetty |

विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी World Cup 2019 | KL Rahul | Athiya Shetty |

World Cup 2019 | KL Rahul | Athiya Shetty | या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं. दोघंही या नात्याबद्दल गंभीर असून एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत आहेत.

0106

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी सध्या तिच्या अफेअरच्या चर्चांनी लाइम लाइटमध्ये आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आथिया क्रिकेटर केएल राहुलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघं रिलेशनशिपमध्ये असून आपल्या नात्याबद्दल दोघीं गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
0206

बॉलिवूड लाइफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत केएल राहुलचं ज्या अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं त्यातील एकाही मुलीसोबत तो रिलेशनशिपमध्ये नव्हता. पण असं म्हटलं जातंय की राहुल आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात असून सार्वजनिक ठिकाणी मात्र कधीच एकत्र दिसत नाहीत.

जाहिरात
0306

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि आथिया एकमेकांसोबत अनेकदा फिरायला जातात. या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं. दोघंही या नात्याबद्दल गंभीर असून एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत आहेत.

जाहिरात
0406

राहुल आणि आथियाची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने झाली. आकांक्षा रंजनने दोघांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. एप्रिल महिन्यात हा फोटो शेअर करण्यात आला होता.

जाहिरात
0506

बॉलिवूड लाइफच्या मते, आथियाला जेव्हा याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर केएल राहुलशी याबद्दल संपर्क होऊ शकला नाही. सध्या तो वर्ल्ड कपमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राहुल आणि आथियाच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे तर येणाऱ्या काळात कळेलच.

जाहिरात
0606

याआधी केएल राहुलचं नाव सोनल चौहान आणि निधी अग्रवाल यांच्यासोबत जोडलं गेलं आहे. मात्र दोघींनीही यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. निधीने तर केएल राहुलला आपला भाऊच मानलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या