अनन्या (Ananya marathi movie) आणि टाईमपास 3 (Timepass 3) सिनेमांमध्ये लवकरच झळकणाऱ्या हृता दुर्गुळेच्या (Hruta Durgule) एका फोटोवर एका चाहतीने फारच गोड कमेंट केल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या चौफेर बॅटिंग करताना दिसत आहे. म्हणजेच काय तर एकीकडे मालिका तर दुसरीकडे तिचे दोन सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.
अनन्या ही एका अपघातात वाचलेल्या मुलीची प्रेरणा देणारी गोष्ट आहे तर टाईमपास सिनेमात ती पालवी पाटील नावाच्या रावडी भूमिकेत दिसणार आहे.
हृता ही यंग जनरेशन साठी एक प्रेरणा आहे. तिचं प्रत्येक काम हे आजच्या युवा पिढीला खूप आवडणारं आहे.
त्यामुळे एका चाहतीने तिला ‘प्लिज तुम्ही माटुंग्याच्या SNDT कॉलेजमध्ये या. अनन्या हे आमच्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. तुमच्यामुळे मुलींना खूप प्रेरणा मिळेल. प्लिज आम्हाला भेटायला या’ अशा शब्दात गोड विनंती केली आहे.
हृताचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मालिकांमध्ये कमावलेल्या यशाने हृताचे शेकडो फॅनपेज आहेत जे तिला कायम सपोर्ट करताना दिसतात.
हृता सुद्धा तिच्या सगळ्या फॅनपेजशी जोडलेली आहे असं अनेकदा दिसून आलं आहे. त्यांनी बनवलेले वेगवेगळे व्हिडिओ हृता शेअर करत असते.
एकीकडे दादा एक गुड न्यूज आहे नाटकाचे प्रयोग करताना ती दिसते. तर मन उडू उडू झालं मालिकेत सुद्धा आता तिचा एक महत्त्वाचा ट्रॅक लवकरच सुरु होणार आहे.