JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कसा झाला Deep Sidhu चा अपघात? Scorpio कारचा चक्काचूर; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

कसा झाला Deep Sidhu चा अपघात? Scorpio कारचा चक्काचूर; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

पंजाबी अभिनेता (Punjabi actor) दीप सिद्धूच्या (Deep Sidhu) निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुंडली सीमेजवळ झालेल्या अपघातात अभिनेत्याचा (actor died in an accident) मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: पंजाबी अभिनेता (Punjabi actor) दीप सिद्धूच्या (Deep Sidhu) निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुंडली सीमेजवळ झालेल्या अपघातात अभिनेत्याचा (actor died in an accident) मृत्यू झाला. तो आपल्या मित्रांसह दिल्लीहून पंजाबला परतत होता. आता दिल्ली पोलिसांनी तपासातून या अपघाताची संपूर्ण माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू स्कॉर्पिओ कारमधून (Scorpio car) जात होता. यादरम्यान त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. टक्कर इतकी भीषण होती की, या अपघातात अभिनेता दीप सिद्धूला जीव गमवावा लागला. हा अपघात सोनीपत जिल्ह्यात झाला. सिद्धूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खरखोडाच्या सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी सिद्धूची मैत्रीणही त्याच्यासोबत होती असे सांगण्यात येत आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातावेळी दीप स्वतः स्कॉर्पिओ चालवत होता. ट्रकच्या धडकेनं गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं समजतंय.

संबंधित बातम्या

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीप स्वत: कार चालवत होता. व्हॅलेंटाइन डेला तो आपल्या मैत्रिणीसोबत दिल्लीला आला होता आणि मंगळवारी परतत होता. यादरम्यान अचानक त्याची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या भागात घुसली. यादरम्यान दीपनेही कार वाचवण्याचा प्रयत्न केला आणि कार चालकाच्या बाजूनं पूर्णपणे घुसली गेली. त्याच्या मैत्रिणीलाही गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर त्याच्या मैत्रिणीने स्वतः पोलिसांना संपूर्ण माहिती दिली पण नंतर ती बेशुद्ध झाली. शेतकरी आंदोलनादरम्यान सिद्धू याचं नाव गाजलं होतं. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात दीप सिद्धू आरोपी होता. नंतर अभिनेत्याला जामीन मिळाला. अचानक आलेल्या या भीषण अपघाताच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. यावर त्याच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दीप सिद्धू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. चरणजीत चन्नी यांनी ट्विट करून लिहिले, सुप्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवक दीप सिद्धू यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या