Malaika Arora Latest Photoshoot : वय वाढत असतानाही आपलं फिटनेस राखून चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या मलायका अरोराने आता पुन्हा एकदा बोल्ड आणि हॉट फोटोशूट केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अलिकडेच मलायका मालदीवमधून सुट्टी संपवून बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत मुंबईत परतली आहे. मलायका अनेकदा तिच्या बोल्ड लूकने सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. मालदीव ट्रिपवरून परतल्यानंतर तिने बोल्ड लूकमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, जे सध्या फार व्हायरल होत आहेत.
वयाच्या 48 व्या वर्षी मलायका अरोराने नुकतेच असे बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यामुळं त्या फोटोंवर लोकांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मलायका लेपर्ड प्रिंट ब्रॅलेटसह मॅचिंग स्कर्टमध्ये दिसत आहे. त्याच वेळी या आउटफिटसह तिने तिच्या गळ्यात हलका नेकपीस घातलेला आहे.
या लूकमध्ये तिने खूप हलका मेकअप केला आहे. फोटो पाहून तिचे काही चाहते त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत, तर काही त्याला सल्ला देत आहेत की आता वय 48 झालेलं आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हवी.
अभिनेत्री मलायका अरोराच्या या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले, 'शेरनी'. आणखी एका युजरने लिहिले, 'अर्जुन कपूर कुठं आहे'. अनेकांनी या फोटोंवर फायर इमोजी देखील पोस्ट केलेल्या आहेत. एका युजरने तिच्या या व्हायरल फोटोंवर 'आपकी हर अदा कातिलाना है' अशी भन्नाट कमेंट केली आहे.
मलायका अरोराला सध्या इंडियाज बेस्ट डान्सर या डान्स रिअॅलिटी शो ची महत्त्वाची जज म्हणून पाहिलं जातं. शो चे प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात, ज्यामध्ये ती नेहमी जजसोबत मस्ती करताना दिसते.