JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कंगनाने दिली धमकी, प्रतिक्रिया विचारली तर गृहमंत्र्यांनी...!

कंगनाने दिली धमकी, प्रतिक्रिया विचारली तर गृहमंत्र्यांनी...!

कंगना रानावतने सरळ धमकावत ‘जिसमे दम है, तो मुंबई आने से रोक के बताये’ अशी उघडपणे धमकी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  नागपूर, 05 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केली. तिच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने कंगनावर सडकून टीका केली आहे. आता कंगनाने जाहीरपणे धमकी दिली आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुचक प्रतिक्रिया दिली. कंगना रानावतने  सरळ धमकावत ‘जिसमे दम है, तो मुंबई आने से रोक के बताये’ अशी उघडपणे धमकी दिली. या मुद्द्यावर प्रश्न विचारता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मीडिया समोर हात जोडले आणि न बोलता निघून गेले. तसंच राज्यात ड्रग्स माफियांचा प्रश्नांवर गृहमंत्री यांनी चुप्पी साधली. आज नागपूरच्या सिव्हील लाईन पोलीस जिमखाना येथील नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आयुक्तांचा सत्कार करण्यात आला या निरोप कार्यक्रमाला सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. कंगना झाली उपरती तर दुसरीकडे कंगनानं एक ट्वीट केलं आहे. मुंबई ही आपली कर्मभूमी असून मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं आहे, असं कंगनानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईशी तुलना POK शी केल्यानंतर कंगनावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री कंगना हिनं मुंबईबाबतच्या आपल्या भावना ट्वीट करून व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रातील माझ्या मित्राचे आभार मागण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहिती आहे. तसेच मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं आहे. त्यामुळे माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याची गरज मला वाटत नाही.जय मुंबई जय महाराष्ट्र’ शिवसेनेनं पुकारले सोशल आंदोलन दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कॅम्पेन सुरू केलं आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पोस्टर तयार केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण तीव्र झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत (Anil Deshmukh) सर्व स्तरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही कंगनाविरोधात अनेक ठिकाणी निषेध केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी POK शी मुंबईची तुलना करणार्‍या कंगनाविरोधात रस्त्यावर उतरतानाही दिसली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जच्या चौकशीवर कंगनाने मुंबईची तुलना  पाकिस्तानशी केली. यावर आता शिवसेनेकडून काही पोस्टर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ‘ये डर होना चाहिए मुंबई व महाराष्ट्राचा नाद कोणी करू नये!’, ‘मुंबई POK वाटते तर… कंGOना’ अशा शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या