JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hemant Dhome: 'आता बरोबर एक वर्षाने...'; हेमंत ढोमेनं शेअर केली खास POST

Hemant Dhome: 'आता बरोबर एक वर्षाने...'; हेमंत ढोमेनं शेअर केली खास POST

अभिनेता हेमंत ढोमेनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टनं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट: मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून ओळखला जाणारा हेमंत ढोमे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमीच काहीना काहीना अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अशातच हेमंत ढोमेनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टनं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेमंत ढोमेनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘सनी’ असं या नव्या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटांचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सनी’ असं त्याच्या नव्या भूमिकेचं नाव असणार आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा -  Brahmastra ची स्टोरी लीक; ‘ही’ असणार खरी खलनायक, रणबीर कपूरची होणार मोठी फसवणूक हेमंतनं ही पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर 2021 ला आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो…झिम्मा!!! आता बरोबर एक वर्षाने त्याच शुक्रवारी पुन्हा आनंदाचा खेळ तुमच्या जवळच्या माणसांकडू… जवळच्या चित्रपटगृहात!’ त्याची ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे सोबतच भरपूर साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत. हेमंतच्या आगमी सिनेमाचं पोस्टर आऊट झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान,‘झिम्मा’ सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांने केलं आहे. तर इरावती कर्णिक यांनी लेखन केलं आहे. मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांना उत्तम प्रतिसाद दिलेल्या पहायला मिळाला. ‘झिम्मा’ सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची खासियत म्हणजे विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला हा सिनेमा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या