मुंबई, 8 जानेवारी- झी मराठीवरील नव्याने सुरु झालेला हे तर काहीच नाही ( he tar kahich nay) हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्यात कमी वेळेत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये अनेक मोठमोठ्या सेलेब्स विविध क्षेत्रातील व्यक्तींने हजेर लावली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्याचा प्रत्येकाचा किस्सा..सर्वांना हसण्याच भाग पाडतो. सध्या या शोमधील मी पडले म्हणून ‘दे दणादण’ हा चित्रपट गोल्डन जुबली झाला हे वाक्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. एका मराठी अभिनेत्रींने तिच्या्बाबतीत घडलेला हा किस्सा या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सांगितल आहे. झी मराठीवरी हे तर काहीच नाही या कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण ( prema kiran ) यांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी त्यांनी नारायण देऊळगावकर यांनी दिग्दर्शित आणि महेश कोठारे यांची निर्मिती असलेला दे दणादण ( de danadan movie) या चित्रपटाविषयी एक किस्सा सांगितला.
त्यावेळी प्रेमा म्हणाल्या की, ‘मी पडले म्हणून दे दणादण हा चित्रपट हिट झाला’ याचा किस्सा सांगितला. माझा सिनेमा दे दणादण तुम्हाला माहीतच असेल. तो एक गोल्डन जुबली सिनेमा. पुढे चित्रपटाविषयी सांगताना त्यातील गाण्यांची आठवण करुन देत त्यांनी ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याचे थोडे बोलही गाऊन दाखवले. या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं अशी ताकीद दिली होती. वाचा- ओमिक्रॉनचा धसका! ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील हा फोटो सांगतोय सत्य त्यानंतर शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. आणि अवघी दोन पावले पुढे जाऊ एवढं पुढे गेल्यावर त्यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. असं… प्रेमा या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. याबद्दल देखील त्यांनी सांगितलं. मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला असं म्हणताच सर्वजण हासू लागतात. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.