JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: 'माता की चौकी'मध्ये गाणारी गायिका ते बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर! असा होता सुनिधीचा प्रवास

HBD: 'माता की चौकी'मध्ये गाणारी गायिका ते बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर! असा होता सुनिधीचा प्रवास

प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानच्या (Sunidhi Chuhan) वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी.

0110

प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chuhan) आज एक प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाते. अनेक रियॅलिटी शोजमध्ये ती जज म्हणून दिसली होती. पण त्यामागे सुनीधीची फार मेहनत देखील होती. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी.

जाहिरात
0210

सुनिधीचा जन्म 14 ऑगस्ट 1983 ला दिल्लीत झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने गायला सुरूवात केली होती. माता की चौकी तसेच अनेक लहान मोठ्या ठिकाणी ती गायची. पण ‘मेरी आवाज सुनो’ या शोमधून तिला मोठी ओळख मिळाली.

जाहिरात
0310

16 व्या वर्षीच सुनिधीला रामगोपाल वर्मा यांचा चित्रपट ‘मस्त’मध्ये गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट झाली होती. त्यानंतर सुनिधीच्या करिअरलाही गती मिळाली.

जाहिरात
0410

सुनिधी चौहानने ‘रुकी रुकी सी जिंदगी’ गायलं होतं ते सुपरहीट ठरलं होतं. हिंदी सोबतच तिने पंजाबी, बंगाली, आसमी, नेपाळी, तमिळ भाषेतही गाणी गायली आहेत.

जाहिरात
0510
जाहिरात
0610

चित्रपटांव्यतिरिक्त तिने अनेक अल्बम्समध्येही गायलं आहे. देश-विदेशातही तिचे अनेक शोज होतात. तिने ३००० हून गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

जाहिरात
0710

सुनिधीने कमी काळातच फार यश मिळवलं होतं. पण कमी वयातच घेतलेले निर्णय फार चुकिचे ठरले होते. ज्यामुळे तिचं वैयक्तिक आयुष्य संकटात गेलं होतं.

जाहिरात
0810

सुनिधी जेव्हा 18 वर्षांची होती तेव्हा घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने 14 वर्षे मोठ्या डायरेक्टर बॉबी खानशी लग्न केलं होतं. पण तिचा हा निर्णय चुकिचा ठरला. १ वर्षानंतरच हे लग्न तुटलं.

जाहिरात
0910

सुनिधी घटस्फोटानंतर फार तणावात होती. त्यानंतर 9 वर्षांनंतर तिने म्युझिक कंपोझर हितेश सोनिकशी विवाह केला. हितेश आणि सुनिधीमध्येही 14 वर्षांचं अतंर आहे. पण अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते.

जाहिरात
1010

सुनिधी आणि हितेश यांचा मुलगा देखील आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या