JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नेहमीच मेकअपशिवाय राहते ही अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात

नेहमीच मेकअपशिवाय राहते ही अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात

बॉलिवूडच्या अनेक यशस्वी अभिनेत्री वेगवेगळ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करताना दिसतात. पण एका अभिनेत्रीनं फेअरनेस क्रीमची तब्बल 2 कोटी रुपयांची जाहीरात चक्क नाकारली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे : अभिनेत्री आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिराती हे एक ठरलेलं समीकरण आहे. बॉलिवूडच्या अनेक यशस्वी अभिनेत्री वेगवेगळ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करताना दिसतात. पण एक अभिनेत्री अशी आहे जिने फेअरनेस क्रीमची तब्बल 2 कोटी रुपयांची जाहीरात चक्क नाकारली. ही अभिनेत्री आहे साई पल्लवी. पल्लवीचा आज वाढदिवस. तिचा जन्म 9 मे 1992 मध्ये झाला. आज पल्लवी साऊथमधील सर्वात पॉप्युलर अभिनेत्री मानली जाते. पण मागच्या वर्षी 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारल्यानं प्रचंड चर्चेत आली होती. पल्लवीनं आतापर्यंत तमिळ, मल्याळम आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिनं आतापर्यंत ‘अथिरन’ (Athiran) , ‘फिदा’ (Fida), ‘काली’ (Kaali), ‘प्रेमम’ (Premam) हे सुपरहिट सिनेमा दिले आहे. त्यामुळे ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साई पल्लवी दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिला नेहमीच तिचा चेहरा जसा आहे तसा दाखवायला आवडतं. ती जास्त मेकअप पासून लांब असते आणि तिच्या या सिंपल लुकमळेच तिच्या लोकप्रियतेत एवढी वाढ झालेली आहे. तिनं साउथमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. स्वतःच्या निधनाबाबत ऋषी कपूर यांनी केलेली ही भविष्यवाणी अखेर खरी ठरली!

जेव्हा पल्लवीनं फेअरनेस क्रीमची जाहीरात नाकारली तेव्हा तिच्या नावाची प्रचंड चर्चा झाली. तिला एका मुलाखतीत या विषयी विचारण्यात आलं. त्यावर पल्लवी म्हणाली, ‘मी ही जाहिरात करू शकत नाही कारण मी एक भारतीय आहे आणि त्या दृष्टीनं माझा रंग योग्य आहे. मला वाटतं अशाप्रकारच्या अनेक जाहिराती लोकांना आणि खास करून महिलांना चुकीचा संदेश देतात. त्यामुळे मला या जाहिरातीचा भाग व्हायचं नाही.’ आठशे खिडक्या नऊशे दारं! लॉकडाऊनमध्ये शूट केली नवी मालिका, पाहा VIDEO पल्लवी पुढे म्हणाली, ‘मी या जाहिरातीचे पैसे घेऊन काय करू. जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मला त्याच तीन चपात्या आणि भात खायचा आहे. माझ्या गरजा जास्त नाहीत आणि मला साधं राहायला आवडतं.’ पल्लवीच्या या मुलाखतीतील उत्तरानंतर तिचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं. अनेकांनी तिच्या या प्रमाणिकपणाचं आणि निर्णयाचं कौतुक केलं होतं.

आजकाल जिथे मुलींना मेकअप करण्याची हौस दिसून येते त्या जगात पल्लवी मात्र मेकअपला अजिबात महत्त्व देत नाही. सिनेमातही ती शक्यतो मेकअपशिवाय किंवा मग अत्यंत कमी मेकअपला प्राधान्य देते. त्यामुळे तिचा हा साधेपणाच प्रेक्षकांना सर्वाधिक भावतो. अभिनेय क्षेत्रात करोडोंच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री पेशानं डॉक्टर आहे. पल्लवीनं पदार्पणाच्या ‘फिदा’ सिनेमातूनच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पल्लवीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. ‘ऑडिशनला मला इंटिमेट सीन करावा लागला होता’, अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या