JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sachin Pilgaonkar B'day: गालावरच्या खळीनं केलं क्लीनबोल्ड! तुम्हाला माहितेय का सचिन-सुप्रियांची Love Story

Sachin Pilgaonkar B'day: गालावरच्या खळीनं केलं क्लीनबोल्ड! तुम्हाला माहितेय का सचिन-सुप्रियांची Love Story

बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतसुद्धा अशा काही जोड्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यातीलच एक लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ही होय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑगस्ट-   बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतसुद्धा अशा काही जोड्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यातीलच एक लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ही होय.काल सुप्रिया पिळगांवकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. आणि विशेष म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी सचिन पिळगांवकर आपला वाढदिदवस साजरा करत आहेत. या दोघांच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. सचिन पिळगांवकर यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सचिन यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. सचिन पिळगांवकर यांनी एक बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी जवळजवळ 50 चित्रपटांमध्ये एक बालकलाकार म्हणून काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचं मोठं योगदान आहे.

सचिन-सुप्रिया पिळगांवकर लव्हस्टोरी- ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठीतील प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. यामध्ये त्यांची सह कलाकार म्हणून सुप्रियाचं होत्या. एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी असं देखील म्हटलं आहे की, सुप्रिया यांच्या गालावर खुपचं सुंदर खळी पडते आणि त्यावरचं सचिनजी भाळले होते. या चित्रपटामुळेच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. (हे वाचा: Supriya Pilgaonkar B’day: सुप्रिया पिळगावकरांचा वाढदिवस लेकीने बनवला खास; शेअर केले Unseen Photo ) त्यांनतर त्यांनी 1985 मध्ये लग्नसुद्धा करण्याचं ठरवलं होतं. मात्र सुप्रिया या केवळ 17 वर्षांच्या होत्या. तर सचिन 27 वर्षांचे होते. या दोघांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे सर्वांनाचं असं वाटायचं की हे नातं फार काळ टिकणार नाही. मात्र या जोडीने सर्वांनाचं चुकीचं ठरवलं. त्यांच्या प्रेमाने त्यांच्या नात्यात कधी वयाची अडचण होऊ दिली नाही. आणि आज जवळजवळ 33 वर्षे झालं ते अगदी आनंदाने संसार करत आहेत.या दोघांना श्रिया नावाची एक लेकसुद्धा आहे. श्रियाने ‘एकुलती’ एकमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. सध्या ती विविध भाषांमध्ये काम करत आहे. तिला हिंदी वेबसीरिजने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या