JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD Priyanka Chopra: शाळेत वर्णभेदाचा करावा लागला होता सामना; आता ग्लोबल स्टार झाली आहे देसी गर्ल

HBD Priyanka Chopra: शाळेत वर्णभेदाचा करावा लागला होता सामना; आता ग्लोबल स्टार झाली आहे देसी गर्ल

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच मिस वर्ल्ड ठरलेल्या प्रियंका चोप्राचा कसा होता प्रवास पाहा.

0112

ग्लोबल स्टार अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राचं नाव आज जगभरात ओळखलं जातं. एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक यशस्वी महिला म्हणून प्रियंकाकडे पाहिलं जातं. पण त्यासाठी प्रियंकाला मोठा संघर्ष करावा लागला होता.

जाहिरात
0212

प्रियंकाचा जन्म १८ जुलै १९८२ ला जमशेदपूर , झारखंडमध्ये झाला होता. तर तिचे आईबाबा दोघेही डॉक्टर असून इंडियन आर्मीत होते. त्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणही घ्यावं लागलं होतं.

जाहिरात
0312

आर्मी पार्श्वभूमी असल्याने प्रियंकाला वेगवेगळ्या ठिकणी वास्तव्य करावं लागलं होतं. पण हा बदल तिने स्वीकारला होता. तिचं काही शिक्षण हे लखनऊ तर काही बरेलीत पूर्ण झालं होतं.

जाहिरात
0412

प्रियंका १३ वर्षांची असताना तिच्या नातेवाइकांकडे अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. क्वीन्स, न्यूयॉर्कमध्ये ती राहत होती. त्याचवेळी तिने काही म्युझिक क्लासेसही जॉइन केले होते.

जाहिरात
0512

पण त्याचवेळी तेथील अमेरिकन आणि आफ्रिकन वर्गमित्र-मैत्रीणींकडून तिला वर्णभेदासाठीही सामेरं जावं लागलं होतं. तिला ब्राउन स्किन साठी चिडवलं जायचं. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता.

जाहिरात
0612

३ वर्षे तिथे शिक्षण घेतल्यानंतर प्रियंका पुन्हा भारतात परतली. पण तिथे तिच्यात फारच न्युनगंड आला होता. आत्मविश्वास खालावला होता. असही ती म्हणाली होती.

जाहिरात
0712

त्यानंतर प्रियंकाने भारतात पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. बरेलीला ती तिचं होमटाउन मानते. तिथेच तिचं पुढील शिक्षण पूर्ण झालं होतं.

जाहिरात
0812

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच प्रियंका मिस वर्ल्ड ठरली होती.

जाहिरात
0912

त्यानंतर प्रियंकाचा फिल्मी प्रवास सुरू झाला होता. २००२ साली हमराज या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

जाहिरात
1012

यानंतर प्रियंकाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूड ते थेट हॉलिवूड असा प्रवास प्रियंकाने केला. पण त्यासाठी मोठे कष्ट तिने घेतले होते.

जाहिरात
1112

आज प्रियंका केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक गायिका, मॉडेल आणि उद्योजिकाही आहे.

जाहिरात
1212

प्रियंकाचं स्वतःचं प्रोडक्शन हाउस, अमेरिकेत स्वतःच रेस्टॉरंट, हेअर केअर ब्रँड तर बेव्हेर्ली हिल्स या अमेरिकेतील लॅव्हीश ठिकाणी स्वतःच घर हे सगळं ही प्रियंकाने अभिनयाव्यतिरिक्त केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या