बॉलिवूड मधील अनेक प्रसिद्ध जोड्यांमधील एक म्हणजे नीतू कपूर आणि ऋषी कपूर. ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांची जोडी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.
बॉलिवूड मधील अनेक प्रसिद्ध जोड्यांमधील एक म्हणजे नीतू कपूर आणि ऋषी कपूर. ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांची जोडी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. नीतू यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या नीतू आणि ऋषी यांच्या प्रेमकहाणी विषयी.
नीतू यांचा जन्म 8 जुलै 1958 ला दिल्लीत झाला होता. नीतू अवघ्या 14 वर्षांच्या होत्या तेव्हा नीतू आणि ऋषी यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यावेळी त्यांची आणि ऋषी यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली आणि हळू हळू ते एकमेकांच्या प्रेमात पडू लागले होते. नीतू यांनी 1973 साली रिक्षेवाली या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होत.
नीतू आणि ऋषी यांचं प्रेमप्रकरण काही वर्षे सुरू होत मात्र एकदा अशी ही वेळ होती जेव्हा नीतू आणि ऋषी यांचं नातं तुटलं होतं. त्यांनी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. त्यांच्या या ब्रेकअपची आजही चर्चा होते.
1979 साली ते एकाच चित्रपटात काम करत होते. झुटा कही का या चित्रपटात ते एकत्र काम करत होते. पण एकमेकांमध्ये आलेले दुरावे यामुळे ते एकत्र शूटिंग करत असतानाही एकमेकांशी बोलत नव्हते.
एका मुलाखतीत ऋषी यांनी हा किस्सा सांगितला होता. तेव्हा नीतू यांचे रडून रडून डोळे पूर्ण लाल झाले होते असही ऋषी यांनी सांगितल होतं. 1980 साली नीतू आणि ऋषी यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. आणि हे कपल बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल ठरलं.