JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शाळेतील लाजरी मुलगी कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? पाहा मुक्ता बर्वेचा प्रेरणादायी प्रवास

शाळेतील लाजरी मुलगी कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? पाहा मुक्ता बर्वेचा प्रेरणादायी प्रवास

शाळेतील लाजरी-बुजरी मुलगी ते अष्टपैलू अभिनेत्री; असा होता मुक्ताचा अभिनय प्रवास

0111

मुक्ता बर्वे (Mukta Barve) हे मराठी सिनेसृष्टीतील एक मोठ नाव. मुक्ताने आजवर अनेक सुपरहीट चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधूनही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. पाहा कसा होता मुक्ताचा अभिनय प्रवास.

जाहिरात
0211

पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये मुक्ताचा जन्म झाला. एका मध्यामवर्गीय कुटुंबात तिचं बालपण गेलं.

जाहिरात
0311

मुक्ता शाळेत अगदी लाजरी - बुजरी मुलगी होती. तर कोणाशी बोलण्याचाही आत्मविश्वास तिच्यात नव्हाता.

जाहिरात
0411

पण शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुक्ताने अभिनयात रस घेतला. तिने पुण्याच्या एस. पी कॉलेज मधून पुढील शिक्षण पूर्ण केलं. या दरम्यान ती नाटकांत रस घेऊ लागली.

जाहिरात
0511

मुक्ताने नाटकांपासूनच आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली होती. 1996 साली तिने पहिल्या व्यावसायिक नाटकात काम केलं. 'घर तिघांचं असावं' असं या नाटकाचं नाव होत.

जाहिरात
0611

त्यानंतर मुक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. घडलय बिघडलय ही मुक्ताची पहिली मालिका होती.

जाहिरात
0711

यानंतर मुक्ता अनेक हीट मालिकांमध्ये झळकली. यात पिंपळपान, बंधन, श्रीयुत गंगाधार टिपरे, आभाळमाया, अग्निहोत्र, रुद्रम या मालिकांचा समावेश आहे.

जाहिरात
0811

२००४ साली मुक्ता चित्रपटांकडेही वळली. चकवा हा तिचा पहिला चित्रपट होता. तर त्यानंतर अनेक हीट चित्रपट तिने दिले. यात डबल सीट, मुंबई पुणे मुंबई, जोगवा, मंगल अष्टके वन्स मोर अशा सुपरहीट चित्रपटांचा समावेश आहे.

जाहिरात
0911

मुक्ता नुकतीच स्माईल प्लिज या चित्रपटात झळकली होती. तर त्यासाठी तिला फिल्मफेअर मराठी ही पुरस्कार देखिल प्राप्त झाला आहे.

जाहिरात
1011

मागील वर्षी मुक्ता देवी या शॉर्टफिल्म मध्ये दिसली होती. त्यातील तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं.

जाहिरात
1111

मुक्ताने एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज मुक्ताचा वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या