भैयासाहेब ते अजितकुमार देव अभिनेता किरण गायकवाडने अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
छोट्या पडद्यावरील सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा अभिनेता किरण गायकवाडचा (Kiran Gaikwad) आज वाढदिवस. पाहा अभिनेत्याचा कसा होता अभिनयप्रवास.
किरण महिंद्रा कंपनीत नोकरीही करत होता. आजारी असल्यामुळे त्याने नोकरी सोडली होती. व अभिनयाच्या आवडीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली.
कॉलेज जीवनापासूनच त्याला नाटकांत काम करण्याची आवड होती. त्यानुसार तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करू लागला.
त्यानंतर त्याला २०१७ साली लागीर झालं जी या झी मराठी वरील मालिकेत भैयासाहेब हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. सहाय्यक पात्र असूनही किरणने ते अगदी चोख साकरलं आणि पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेतला होता.
किरणच्या अभिनयाची दखल त्या मालिकेनंतर घेण्यात आली. आणि २०२० मध्ये किरणला अजितकुमार देव हे मुख्य पात्र साकरण्याची संधी मिळाली.
किरणने या संधीचं नक्कीच सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही. सध्या किरणची 'देवमाणूस' ही मालिका प्रचंड चर्चेत आहे.
गेल्या वर्षभरापासून मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढत ठेवली आहे. किरणच्या कामाचं सगळीकडूनचं कौतुकही केलं जात आहे.