टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विगेट ने ‘बेहद’, ‘बेपन्नाह’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.
जेनिफर विगेट (Jennifer Winget) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक आहे. जेनिफरचा आज वाढदिवस(Birthday) आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 मे 1985 ला मुंबईत झाला होता. जाणून घ्या जेनिफर विषयी खास गोष्टी.
जेनिफर विगेट अभिनियाशिवाय तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. जेनिफचे वडील हे ईसाई मराठी आहेत तर आई पंजाबी आहे. त्यामुळे तिला हिंदी, मराठी आणि पंजाबी तिन्ही भाषा येतात.
जेनिफरने लोकप्रिय मालिका 'शाका लाका बूम बूम' मधून बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
जेनिफर आज टीव्ही दुनियेची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आबे. अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांच मन जिंकलं आहे.