JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Happy Birthday Ekta Kapoor: डेलिसोप queen च्या 'या' मालिका आजही सुपरहिट

Happy Birthday Ekta Kapoor: डेलिसोप queen च्या 'या' मालिका आजही सुपरहिट

टीव्हीवर एक काळ गाजवणारी, प्रेक्षकांना आवडणाऱ्या ड्रामा आणि मसाला असलेल्या सिरियल्सची कर्ता धर्ता (Ekta Kapoor) एकता कपूर हिचा आज वाढदिवस. तिच्या कोणत्या मालिकांना आजही विसरणं अशक्य आहे जाणून घेऊया या फोटो गॅलेरीमधून.

019

एकता कपूरने टीव्हीवर एक काळ गाजवला आहे. तिच्या एकाहून एक मालिका लाखो प्रेक्षकांवर आजही भुरळ घालत आहेत. कोणत्या आहेत या मालिका?

जाहिरात
029

पवित्र रिश्ता ही अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची मुख्य भूमिका असणारी मालिका अनेक वर्ष लोकांचं मनोरंजन करत होती. मानव आणि अर्चना यांची ही प्रेमकथा सुंदर गुंफलेली होती

जाहिरात
039

क्यूकी सास भी कभी बहू थी ही ८ वर्ष टीव्हीवर गाजलेली मालिका तिचं नंबर 1 चं स्थान राखून होती. या मालिकेत दाखवलेलं कुटुंब आणि त्यांची गोष्ट कायमच हिट ठरली. स्मृती इराणी यांची यात मुख्य भूमिका होती.

जाहिरात
049

कहानी घर घर की या मालिकेने सुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका सुद्धा आठ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती.

जाहिरात
059

दिव्यांका त्रिपाठी आणि करणं पटेल यांच्या मुख्य भूमिकेने सजलेली यह है मोहोब्बते मालिका त्याच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीमुळे खूप प्रसिद्ध झाली होती. इशिता आणि रमण यांच्यातील गोड रुसवे-फुगवे आणि प्रेम सर्वांनाच आवडलं होतं. (फोटो सौजन्य- yeh.hai.mohabbatein.yhm)

जाहिरात
069

साक्षी तंवर आणि राम कपूर यांच्या बडे अच्छे लागते है मालिकेने सुद्धा प्रचंड प्रेम आणि लोकप्रियता मिळवली होती. लग्न झाल्यानंतर बहरत जाणाऱ्या या प्रेम कहाणीला सर्वानीच पसंत केलं.

जाहिरात
079

झी टीव्ही वरील कुमकुम भाग्य या मालिकेची सुद्धा खूप चर्चा झाली. या मालिकेचा दुसरा सीजन सुद्धा आला.

जाहिरात
089

कलर्स वरील नागीण या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं. यात नागीण या पात्रासाठी असलेल्या सगळ्या अभिनेत्रीचं खूप कौतुक झालं.

जाहिरात
099

श्वेता तिवारी ची मुख्य भूमिका असलेली मालिका कसौटी जिंदगी के ही मालिका आणि यातली अनेक पात्र प्रचंड गाजली. कोमोलिका, प्रेरणा, अनुराग, बजाज परिवार अशा अनेक गोष्टी आजही लोकांच्या लक्षात आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या