JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: वडील मंत्री तर आई समाजसेविका, तरीही संघर्षात गेलं भूमी पेडणेकरचं बालपण

HBD: वडील मंत्री तर आई समाजसेविका, तरीही संघर्षात गेलं भूमी पेडणेकरचं बालपण

श्रीमंत कुटुंबात जन्म होऊनही अभिनेत्री भूमी पेडणेकरला संघर्ष करत बालपण जगावं लागलं होतं. पाहा तिचा प्रवास.

0107

कमी काळातच बॉलिवूडमध्ये आपली मोठी ओळख निर्माण करणारी आभिनेत्री भूमी पेडणेकर संघर्ष करून बॉलिवूडमध्ये आली होती. श्रीमंत घरात जन्म होऊनही तिला संघर्ष करावा लागला होता. पाहा तिच्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी.

जाहिरात
0207

भूमीचा जन्म मराठी आणि हरियानवी अशा पार्श्वभूमीत झाला होता. वडिल मराठी तर आई हरियानवी होते. १८ जुलै १९८९ ला मुंबईत झाला होता.

जाहिरात
0307

भूमीच्या वडिलांचं तोंडाच्या कॅन्सरने निधन झालं होतं. ते कामगार मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर भूमीच्या आईने टोबॅकोविरोधात जनजागृती करत समाजसेवा सुरू केली होती.

जाहिरात
0407

भूमी १५ वर्षांची असताना तिच्या आईने तिच्या अभिनय करिअरसाठी कर्ज घेतलं होतं. विस्लिंग वूड या इन्स्टीट्युमध्ये तिने अॅडमिशन घेतलं होतं.

जाहिरात
0507

पण वर्षभरातच तिने ते सोडून दिलं व यशराज स्टुडीओजमध्ये कास्टींग डिरेक्टर म्हणून नोकरी सुरू केली. त्यातून तिने सगळं कर्ज फेडलं होतं.

जाहिरात
0607

जवळपास ६ वर्षे भूमीने यशराज स्टुडीओजमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिने अभिनयासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती.

जाहिरात
0707

२०१५ साली भूमीला पहिला चित्रपट मिळाला. 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या