JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: अभिनयासोबतच उत्कृष्ट गायकही आहे 'देवमाणूस'ची डिम्पल; पाहा अस्मिता देशमुखचा प्रवास

HBD: अभिनयासोबतच उत्कृष्ट गायकही आहे 'देवमाणूस'ची डिम्पल; पाहा अस्मिता देशमुखचा प्रवास

‘देवमाणूस’ मालिकेतील डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुखचा असा होता अभिनय प्रवास.

0111

छोट्या पडद्यावरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री अस्मिता देशमुखचा आज वाढदिवस. हि अभिनेत्री केवळ अभिनयानेच नाही तर गायणानेही प्रेक्षकांचं मन जिंकते. पाहा अस्मिताचा अभिनय प्रवास.

जाहिरात
0211

अस्मिताचा जन्म पुण्यातील देहू या ठिकाणी २९ जूनला झाला होता. तिचं बालपणही पुण्यातच गेलं. हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल या शाळेतून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं.

जाहिरात
0311

अस्मिताने SNDT विद्यापिठातून सायकोलॉजी ही पदवी घेतली आहे. पण अस्मिताला नेहमीच अभिनयातच रस होता. याशिवाय तिला गायणाचीही आवड आहे.

जाहिरात
0411

अभिनयाची आवड असल्याने कॉलेड जीवनापासूनच तिने नाटकांत काम करायला सुरुवात केली होती. याशिवाय ती लहाणपणापसूनच गायमाचे धडेही घेत होती.

जाहिरात
0511

टीव्हीवर येण्याआधी अस्मिताने काही म्युझिक व्हि़डीओ, नाटकं आणि शॉर्टफिल्म्समध्येही काम केलं होतं.

जाहिरात
0611

तिच्या अभिनय कौशल्याने तिला टीव्हीवर झळकण्याची संधी मिळाली. 'देवमाणूस' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या अस्मिता काम करत आहे.

जाहिरात
0711

मालिकेतून अस्मिताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या आभिनयाने तिने अल्पावधीतच प्रेक्षकांवर मोठी छापही पाडली आहे.

जाहिरात
0811

मालिकेत तिची सहाय्यक भूमिका असली तरीही तिची व्यक्तिरेखा विशेष लोकप्रिय ठरत आहे.

जाहिरात
0911

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात अस्मिताने आपल्या गायणाचीही झलक दाखवली होती. अस्मिता अभिनेता स्वप्निल जोशीची मोठी चाहती असल्याचं तिने म्हटलं होतं.

जाहिरात
1011

सोशल मीडियावर अस्मिता फार सक्रिय असते. याशिवाय मालिकेतील सहकलाकारांसमवेत अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते.

जाहिरात
1111

अस्मिताला वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या