सातारा, 26 फेब्रुवारी- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतमी पाटील होय. तिच्या डान्समध्ये लावणी कमी आणि अश्लीलपणा जास्त असतो, असा आरोप तिच्यावर झाला. मात्र तिनं सुरवातीच्या काळात केलेल्या चुकांमुळे अजुन ही तिच्यावर टिका करताना लोकं पाहायला मिळतायेत. तीनं याबाबत महाराष्ट्राची माफी मागितली. एवढं करुण सुद्धा तीच्याबाबत बोललं जातयं मात्र गौतमी पाटील च्या सध्या होणा-या कार्यक्रमांना महिला वर्गाचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय. तिचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. याबाबत अनेक तरुण तरुणींनी नाराजी व्यक्त केली आहे. साता-यातील तरुण तरुणी गौतमीच्या सपोर्टसाठी पुढं सरसावलेलं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काय आहे नेमकं प्रकरण? गौतमी पाटीलचा एक पर्सनल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याबाबत साताऱ्यातील अनेक तरूण तरूणींनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही महिलेचा असा व्हिडिओ व्हायरल करणं मुळात चुकीचं आहे. म्हणूनच साताऱ्यातील तरूणाई तिच्या सपोर्टमध्ये उतरली आहे. सोशल मीडियावर देखील तरूणाई तिच्या सपोर्टमधये उतरली आहे. वाचा- नवऱ्याच्या रूपावर नाही तर गुणांवर भाळल्या बॉलिवूडच्या ‘या’ सुंदरी! गौतमी पाटीलच्या लावणीचा वाद हा मागील काही काळात महाराष्ट्रात सर्व स्तरात चर्चेचा मुद्दा ठरला होता. अगदी सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर पर्यंत अनेकांनी गौतमीचा वाद कसा महाराष्ट्रातील लावणी कलेला घातक आहे यावर भाष्य केले होते. त्यानंतर तिने माफीही मागितली होती. अलीकडेच गौतमीचा साताऱ्यात कार्यक्रम झाला. यावेळी तिने आपण चुका सुधारत असल्याचं सांगितलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गौतमीच्या लावणीवर स्वतः अजित पवार यांनी सुद्धा आक्रमक प्रवित्रा घेतला होता. लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रकार घडता कामा नयेत. काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यात असे कार्यक्रम सुरू आहे. मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित करणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. यावर गौतमीने दादा मला माफ करा, मी या आधी चुकले पण पुन्हा असं करणार नाही म्हणत अजित पवारांची माफी मागितली होती.