JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ganesh Chaturthi 2022: अमृता रावने बाप्पाकडे केला होता खास नवस, पूर्ण होताच पोहोचली कर्जत मंदिरात

Ganesh Chaturthi 2022: अमृता रावने बाप्पाकडे केला होता खास नवस, पूर्ण होताच पोहोचली कर्जत मंदिरात

गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्री अमृता रावने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने आपल्या सहजसाध्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली होती. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. अमृता राव लग्नानंतर चित्रपटांपासून आहे. परंतु तरी ती अजूनही तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. यूट्यूब चॅनलद्वारे ती तिच्या खाजगी आयुष्यासंबंधी अनेक गोष्टी शेअर करत असते. अमृता आणि तिचा पती आरजे अनमोलने यापूर्वीही सांगितलं होतं की, अमृताला आई होण्यासाठी खूप त्रास झाला होता. आई होण्याच्या इच्छेने तिने गणेश मंदिरात जाऊन नवसही मागितला होता. आता गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्रीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. काल घरोघरी विघ्नहर्ता गणरायाचं आगमन झालं आहे. चहूबाजूला वातावरण अगदी प्रसन्न बनलं आहे. काहींनी घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं तर काहींनी मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. दरम्यान अभिनेत्री अमृता राव आणि पती अनमोल यांनीही गणेश मंदिराला भेट दिली आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याबाबत महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल यांनी या नवीन व्हिडिओमध्ये सांगितलं की, ते 2018 मध्ये गणपतीच्या मंदिरात गेले होते, जिथे त्यांनी मूल होण्यासाठी नवस मागितला होता. आता ते पुन्हा त्याच गणपतीच्या मंदिरात गेले आहेत. 2020 मध्ये अमृता आई झाली होती. त्यांनी आपल्या मुलाचे नाव वीर असं ठेवलं आहे.अमृताने आपला यूट्यूब चॅनेल ‘कपल ऑफ थिंग्स’वर ही गोष्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आणि तिचा पती सांगत आहेत की आई बनण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

**(हे वाचा:** Ganesh Chaturthi 2022: कतरिना कैफ ते सलमान खान गणेशोत्सवासाठी जमले एकत्र, समोर आले फोटो ) या व्हिडिओमध्ये, आरजे अनमोल मागील व्लॉगचा संदर्भ देत आहे ज्यामध्ये त्याने अमृताच्या प्रेग्नेंसीच्या अडचणींबद्दल सांगितलं होतं. अनेक प्रयत्न करुनही त्यांना यश आलं नव्हतं. त्यावेळी कोणीतरी त्यांना कर्जतमधील गणपतीच्या मंदिरात जाण्यास सांगितलं. अशी श्रद्धा आहे की या मंदिरात जाऊन आईवडील होण्यासाठी नवस मागणाऱ्या दाम्पत्यांची इच्छा पूर्ण होते. अमृता आणि अनमोलने व्हिडीओमध्ये सांगितलं की, २०१८ मध्ये आम्ही याठिकाणी नवस केला होता. आणि आमचा हा नवस पूर्ण आला आहे. त्यामुळे आज या शुभमुहूर्तावर याठिकाणी पुन्हा येऊन आम्ही गणेशपूजा केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या