सोशल मीडियावर कोण कधी कसं व्हायरल होईल काही सांगता येत नाही. बॉलिवूड कलाकारांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींची देखील सोशल मीडियावर खूप चर्चा आहे
अभिनेता सुशांत सिंह राजपूत सारखाच दिसणारा सचिन तिवारी (Sachin Tiwary) अभिनेत्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे अभिनेता रणबीर कपूरसारखा दिसणारा हा तरूण जुनैद शाह आहे. दरम्यान जुनैदचा काही दिवसांपूर्वी कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला
उत्तर प्रदेशमधील रायबरेली याठिकाणी राहणारा सचिन तिवारी सुशांतवर बनत असलेल्या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची देखील चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे.
जुनैद शाहचा फोटो पाहून स्वत: अभिनेता ऋषी कपूर देखील थक्क झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करून आश्चर्य व्यक्त केले होते.
इमरान हाशमी सारखी दिसणारी ही व्यक्ती पाकिस्तानी मॉडेल आहे. त्याचे नाव मजदक असे आहे (photo credit: youtube/Crazy 4 Bollywood)
अभिनेता कतरिना कैफ सारखी दिसणारी एलीना राय देखील सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. तिचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स होते, आता इन्स्टाग्रावर देखील ती मोठी फॅन फॉलोइंग ती कमावत आहे. (photo credit: instagram/@alinarai07)
अमेरिकन गायिका जुलिया मायकल आणि अनुष्का शर्मा या दोघी एकमेकींसारख्या हुबेहूब दिसतात. त्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दोघींनीही आश्चर्य व्यक्त केले होते. (photo credit: instagram/@juliamichaels/@anushkasharma)
प्रियंका कांडवाल ही टिव्ही अभिनेत्री दिवंगत सुपरस्टार अभिनेत्री मधुबालासारखी दिसते. तिने मधुबालाच्या गाण्यावर अनेक व्हिडीओ देखील बनवले आहेत.
टायगर श्रॉफ सारखे दिसणारे अनेक व्यक्ती समोर आले आहेत. मात्र डेविड सहरिया विशेष प्रसिद्ध झाला. फक्त चेहराच नव्हे तर त्याने टायगरसारखा फिटनेस देखील कमावला आहे.