अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या करिअरचा ग्राफ कायमच चढत्या क्रमाने राहिला आहे. तिने आयुष्यात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमावली आहे आणि त्याचा तिला सार्थ अभिमान आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यावर आधारित केलेली फोटो गॅलरी पाहूया.
आज एवढं नाव कमावणारी आपली लाडकी तेजस्विनी लहान असताना खट्याळ होती हे तिच्या या फोटोमधून कळून येत आहे.
तिने पडद्यावर साकारलेली अनाथांची आई अर्थात सिंधुताई सपकाळ यांची भूमिका अनेकांसाठी अजूनही प्रेरणास्रोत आहे
चाहत्यांच्या लाडक्या तेजूने 100 डेज या मालिकेतल्या भूमिकेमधून सगळ्यांना हादरवून सोडलं होतं. यात तिने एका किलरची भूमिका केली होती.
अभिनयाशिवाय तेजस्विनी एक यशस्वी उद्योजिकाही आहे. तिचा तेजाज्ञा नावाचा ब्रँड आज देशांतर्गत पातळीवर गाजतो आहे.
तेजाज्ञा असो किंवा अगदी एखादी भूमिका त्यात प्रत्येक वेळेला वेगळेपण शोधणं आणि ते आव्हान लीलया पेलणं ही तिची खासियत आहे.
नवरात्री उत्सव आणि तेजस्विनी हे एक वेगळंच समीकरण आहे. प्रत्येक नवरात्री उत्सवात तिचे खास केलेले फोटोशूट्स खूप गाजतात. प्रत्येक वर्षी स्त्रीची वेगवेगळी रूपं ती फोटोज् मधून दाखवते
आता तेजस्विनी निर्माती म्हणून आपल्या समोर आली आहे. क्रिएटिव्ह वाईब्स नावाची स्वतःची निर्मिती संस्था तिने सुरु केली आहे.
एक अभिनेत्री, उद्योजिका, निर्माती याशिवाय अनेक भूमिका ती पार पाडते. जितकी ती कणखर आहे तितकीच ती निरागस आणि निखळ आहे.