अभिनेत्री भारती सिंग प्रमाणे या सेलिब्रिटींनीही कमी काळातच मोठ्या प्रमाणावर वजन कमी केलं आहे. पाहा कोण आहेत.
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंग (Bharti Singh) ही तिच्या वजनासाठीही ओळखली जाते. सुरूवातीपासूनच ती अतिशय वजनदार आहे. नुकतच तिने मोठ्या प्रमाणावर वजन घटवलं आहे. पण यासोबतच आणखीही अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणावर वजन कमी केलं होतं. पाहा कोण आहेत.
गायक आणि प्रसिद्ध गीतकार अदेलेने देखील नुकतच तब्बल ४५ किलो वजन कमी केल्याचं सांगण्यात येत आहे. डायट आणि प्रचंड वर्कआउटच्या जोरावर तिने वजन घटवलं आहे.
प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी देखील प्रचंड वजन वजन कमी केलं आहे. पूर्वी ते २०० किलो होते असं त्यांनी एकदा सांगितलं होतं तर त्यांनी ९८ किलो वजन कमी केलं होतं.
प्रसिद्ध गायक अदनान सामीने देखील मोठ्या प्रमाणावर वजन कमी केलं आहे. पूर्वी त्यांचं वजन २५० किलो इतकं होतं तर आता ते ७५ किलोंवर आलं आहे. योग्य डायट आणि व्यायामाच्या जोरावर १६ महिण्यात त्यांनी वजन कमी केल्याचं सांगितलं जात आहे.
कॉमेडी क्वीन भारती सिंगने नुकतच १५ किलो वजन कमी केलं आहे. १० महिण्याच्या वेळेत तिने हे वजन कमी केलं आहे.
अभिनेता फरदीन खान अनेक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. मात्र नुकतंच त्यानेही तब्बल १८ किलो वजन कमी करत ल६ वेधलं आहे. ६ महिन्यात त्याने ही कामगीरी केली आहे.