आता काही दिवसांतच 2021 हे वर्ष संपणार आहे. या वर्षी मनोरंजनाच्या जगातही वर्षभरात अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळत असतानाच काही दु:खद बातम्याही समोर आल्या. काही कलाकारांनी आपल्या जोडीदाराला घटस्फोट दिला. त्यामुळं आता या वर्षी कोणकोणत्या कलाकारांनी आपल्या जोडीदाराला सोडचिठ्ठी दिली हे जाणून घेऊयात.
2021 मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी याच वर्षी अचानक घटस्फोटाची घोषणा केल्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्याचबरोबर दक्षिण चित्रपटांतील प्रसिद्ध कपल अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी देखील विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यामुळं आता या वर्षी त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला होता.
आमिर खान हा नेहमी सोशल मीडिया आणि लाइम-लाइट पासून दूर राहतो परंतु जेव्हा त्यानं किरण रावसोबत घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघांनीही एक संयुक्त निवेदन जारी करून घटस्फोटाची माहिती दिली होती.
काही महिन्यांपूर्वी साऊथ ची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमी आली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. सामंथा आणि रुथ यांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं.
अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी तुर्कस्थानमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं होतं. परंतु त्यांचं वैवाहिक आयुष्य केवळ 2 वर्षे टिकलं. परंतु काही दिवसांपूर्वी नुसरतने अचानक घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती. तिनं हे लग्न अवैध असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ती यश दासगुप्तासोबत रिलेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली होती.
5 वर्षे आनंदी वैवाहिक जीवन व्यथीत केल्यानंतर अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने यावर्षी पती साहिल सेहगलपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं.
त्याचवेळी टीव्ही अभिनेत्री निशा रावलने तिचा पती अभिनेता करण मेहरा यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करणची प्रतिमा शांत पुरुषाची होती, मात्र निशाने करणवर मारहाणीचा आरोप केला आणि त्याच्यावर दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा आरोपही केला.
प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगवर तिची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत संबंध संपवले. हृदेश सिंग उर्फ यो यो हनी सिंग आणि तलवार यांनी 23 जानेवारी 2011 रोजी लग्नगाठ बांधली.