JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BBM4 सिझनचं पहिलं नॉमिनेशन; कोण राहणार सेफ अन् कोणाची होणार एक्झिट?

BBM4 सिझनचं पहिलं नॉमिनेशन; कोण राहणार सेफ अन् कोणाची होणार एक्झिट?

कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. “ALL IS WELL” म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला.

जाहिरात

बिग बॉस मराठी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑक्टोबर : कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’.  “ALL IS WELL” म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला. सोबतच स्पर्धकांच्या नावाचाही पडदा उघडला आणि 16 सदस्यांची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली. पहिल्याच दिवशी गटातील चारही सदस्यांना कोणता खेळाडू निरुपयोगी आहे? हे ठरवायला सांगितलं. मग काय वाद-विवादाला सुरुवात झाली. अशातच आज घरात पार पडणार आहे सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य . बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद या सदस्यांना निरुपयोगी सदस्य दिले. काल बिग बॉस यांनी सिझनमधील एक मोठे सरप्राईझ देखील सदस्यांना दिले आणि ते म्हणजे “रूम ऑफ फॉर्च्युन”. ज्या खोलीमध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखविले गेले, त्यातून त्यांना एका दरवाज्याची निवड करायची होती. या सांगकाम्या म्हणून झाहीर झालेल्या चारही सदस्यांना आता घरातील सगळी कामे करावी लागणार आहेत. पण, याचसोबत त्यांना एक पॉवर देखील मिळाली आहे.

संबंधित बातम्या

आता हे सदस्य या पॉवर चा कसा उपयोग करणार ? कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे रंजक असणार आहे, कारण घरामध्ये पार पडणार हे  सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य “आटली बाटली फुटली” ! नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांनवर नाराजी व्यक्त केली. तिचे म्हणणे आहे,“बर नाहीये हे दिसते आहे तरी माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात.” तर त्रिशूलने निखिल राजशिर्के यांना जागवायची गरज आहे म्हणून नॉमिनेशनमध्ये टाकले. आता बघूया पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य होणार सेफ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ?.

दरम्यान, पहिल्याच दिवशी असं वातावरण पाहून प्रेक्षकही कमालीचे उत्सुक आहेत. आजपासून 100 दिवस 16 सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या