संपूर्ण बॉलिवूडला आपल्या अभिनयातून आणि नृत्याच्या अदांमधून खिळवून ठेवणारी अभिनेत्री रेखा (Actress Rekha) आजही लाखो प्रेक्षाकांच्या मनावर राज्य करत आहे. 10 ऑक्टोबर 1957मध्ये जन्म झालेल्या रेखा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. आज वयाच्या 67 वर्षीही रेखा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आजही त्यांच्या सौंदर्यात कोणतीही कमी झालेली नाही. रेखा यांच्या बहिणीची मुलगी म्हणजे रेखाची भाची प्रिया सेल्वाराज (priya selvaraj) हिची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. मावशी भाची हुबेहुब सारख्या दिसतात. दोघींचे फोटो पाहून रेखाचे चाहते हैराण झाले आहेत.
रेखाची भाची प्रियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिला पाहून सगळ्यांनी तिची तुलना मावशी रेखा हिच्याशी केली आहे.
मावशी आणि भाचीचं नातं फार खास असतं असं म्हणतात. रेखा आणि प्रिया यांच्याकडे पाहिल्यावर त्याची जाणीव होते. प्रिया आणि रेखा यांचे लुक्स इतके मिळते जुळते आहेत की त्यांना पाहून चाहते हैराण झालेत. प्रिया हुबेहूब रेखा यांच्यासारखी दिसते.
प्रियाचा चेहरा, तिचे लांबसडक केस, तिचे लुक्स अगदी रेखा यांच्यासारखे आहेत. इतकंच नाही तर प्रिया आणि रेखा यांच्या डोळ्यांची नजरही सारखीच आहे.
प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच ती तिचे स्टायलिश फोटो शेअर करत असते. प्रत्येक फोटो तरुणवयातील रेखाची आठवण करुन देतात.
दोघींमध्ये इतक साधर्म्य आहे की पहिल्यांदा जर कोणी प्रियाला पाहिलं तर ते ओळखू शकणार नाहीत की ती प्रिया आहे की रेखा.