चलपती राव
मुंबई, 25 डिसेंबर : मनोरंजनसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी समोर आलीये. साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचं रविवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जीव गेल्याचं समोर आलं आहे. चलपती राव यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यामुळे साऊथ सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांच्या जाण्याने कुटुंब, मित्र-परिवार, चाहते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चलपती राव गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. आरोग्याच्या समस्यांशी ते झुंज देत होते. याशिवाय ते बरेच काळापासून पडद्यापासून दूर होते. चलपती वाढत्या वयाबरोबर अभिनयापासून दूर गेले होते. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर तो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर चाहते आणि स्टार्स सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.
चलपती राव तेलुगू सिनेमातील त्यांच्या कॉमिक आणि खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. आंध्र प्रदेशात जन्मलेल्या चालपतीने इंडस्ट्रीला ‘साक्षी’, ‘ड्रायव्हर रामुडू’ आणि ‘वजराम’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. एवढेच नाही तर हा अभिनेते सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटाचाही एक भाग होते.
दरम्यान, चलपती राव यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तेलुगु सिनेसृष्टीत आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक व्हायचं. आपल्या अभिनयाच्या जोरावर ते चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. मात्र त्यांच्या आकस्मिक मृत्यून सगळ्यांनाच धक्का बसला असून दुःख व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी इंदुमती आणि त्यांची तीन मुले आहेत, ज्यापैकी एक अभिनेता-चित्रपट निर्माता रवी बाबू आहे.