JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माझी तुझी रेशीमगाठ फेम छोट्या परीचा सेटवरील टाईमटेबल माहिती आहे का?

माझी तुझी रेशीमगाठ फेम छोट्या परीचा सेटवरील टाईमटेबल माहिती आहे का?

mazi tuzi reshimgath : माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोटी परी तर सर्वांना माहिती आहे. मात्र तिचा सेटवरचा टाईमटेबल माहिती आहे का…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जानेवारी- छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ’ ( mazi tuzi reshimgath) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडता आहे. यश आणि नेहाची केमिस्ट्री तर प्रेक्षकांचे मन जिंकते. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे एकत्र दिसत आहेत. या मालिकेत नेहा कामतची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे साकारते आहे. याशिवय मालिकेतील सर्वांची लाडकी आणि सोशल मीडिया स्टार छोटी परीचा **(pari)**तर वेगळा चाहता वर्ग आहे. काहीजण तर आवर्जून सांगतात की, आम्ही मालिका फक्त परीसाठी पाहतो. मालिकेतील तिचा निरागस अभिनय सर्वांचीच मनं जिंकतोय.मात्र या लहानग्या परीचा म्हणजे मायराचा ( mayra vyakul ) दररोजचा टाईमटेबल कसा असतो याचा खुलासा नुकताच याचा मालिकेत यशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेने सांगितले आहे. श्रेयस तळपदे परीचे टाईमटेबल सांगताना म्हणाला की, परी रोज सकाळी सेटवर आल्यानंतर सर्वांना गुड मॉर्निंग करते आणि सर्वांच्या गळ्यात पडून भेटते. यानंतर ती माझ्याशी किंवा प्रार्थनाशी गप्पा मारते. कधी कधी तिला सहजच काही तरी सुचते आणि म्हणजे माझे आज लवकर पॅकअप आहे. मुळात तिला पॅकअपच काहीच माहित नसते मात्र ती म्हणते. असं काहीसे परीचे सेटवरचं टाईमटेबल आहे. एका पोर्टलनं देखील याबद्दल माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

मायरा सेटवर सर्वांची लाडकी आहे. ती प्रार्थन बेहेरे तसेच श्रेयश तळपदे यांच्यासोबत अनेक इन्स्टा रील बनवत असते. त्यामुळे देखील ती चर्चेत असते. मायरा खरं तर सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. मायराचे युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहे. मायराचे सर्व अकाउंट तिची आई हँडल करताना पाहायला मिळते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. वाचा- अभिनेत्री श्वेता अग्रवालचं बेबीशॉवर, पती आदित्य नारायणने शेअर केले PHOTO सध्या यश नेहाचे प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी तो समीरच्या मदतीने दररोज नवीन प्लॅन करत आहे. मात्र नेहा काय यशचे प्रेम सहजासहजी स्वीकारणार नाही असं दिसत आहे. प्रेक्षकांना मात्र या दोघांना एकत्र पाहायचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या