मुंबई, 9 जानेवरी- Dia Mirza and Samaira Video: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचे (Dia Mirza) तिची सावत्र मुलगी समायरासोबत (Dia Mirza stepdaughter Samaira) छान बॉन्डिंग आहे. दियाच्या इन्स्टा पोस्ट पाहल्यानंतर या माया लेकिच्या नात्यातील हा गोडवा दिसल्याशिवाय राहत नाही. समायराचे अनेक सुंदर फोटो दिया मिर्झा शेअर करत असते. पुन्हा एकदा दिया मिर्झाने तिच्या इन्स्टावर समायरासोबतचा स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघीही भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दीया आणि समायरा या माय लेकिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर होतच आहे पण चाहत्यांना देखील तो खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 19 हाजारापेक्षा जास्तवेळा पाहण्यात आलं आहे. या व्हिडिओत या दोघी गॅलरीत डान्स करताना दिसत आहेत. दोघींचे ड्रेस देखील एकसारखे आहेत. दोघी एकमेंकीच्या डान्स स्टेप फॉलो करताना दिसत आहेत. वाचा- ईशा गुप्ताला कोरोनाची लागण ; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती दिया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची म्हणजे गुडन्यूज शेअर केली. 14 मे रोजी दिया मिर्झाने मुलगा अवयानला जन्म दिला. दिया मिर्झाने याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
यासोबतच तिनं हे देखील शेअर केले होते की, तिचि प्रेगनेंशी खूप गुंतागुंतीची होती. जन्मानंतर तिच्या मुलाला दोन महिने हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. वैभव रेखी आणि दिया मिर्झा या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. दिया मिर्झाने पहिले लग्न साहिल सांघासोबत केले होते. वैभव रेखीला त्याच्या आधिच्या पत्नीपासून एका मुलगी आहे.