JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / डॉक्टर पोलिसांच्या नव्हे लग्नाच्या बेडीत अडकला; ‘देवमाणूस’ कसा अडकणार एसीपी दिव्याच्या जाळ्यात?

डॉक्टर पोलिसांच्या नव्हे लग्नाच्या बेडीत अडकला; ‘देवमाणूस’ कसा अडकणार एसीपी दिव्याच्या जाळ्यात?

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आता डिम्पल आणि डॉक्टर अर्थात देवी सिंगचं लग्न होत आहे

0107

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मध्ये सध्या फार नवनवी वळणं पाहायला मिळत आहेत. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आता डिम्पल आणि डॉक्टर अर्थात देवी सिंगचं लग्न होत आहे. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. पण आता मालिकेचा शेवट होणार नसल्याचं समोर येत येत आहे. तर इन्सपेक्टर दिव्या सिंग आणि देवी सिंग यांच्यात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
0207

दिव्याच्या चौकशीपासून वाचण्यासाठी डिम्पल आणि डॉक्टरने घाईघाईने लग्न करण्याचा घाट घातलेला असतो. पण दिव्या मात्र देवी सिंग पर्यतं आता पोहोचली आहे. तर डॉक्टर हाच देवी सिंग असल्याचही तिला आता समजलं आहे.

जाहिरात
0307

त्यामुळे दिव्या डॉक्टरला काहीही न कळू देता त्याच्याकडून आणखी पुरावे जमवण्याचा प्रयत्न करत आहे. तर डॉक्टरला देखिल तिच्यावर संश येत आहे.

जाहिरात
0407

दिव्याने आता एक प्लॅन करत डॉक्टरला घऱी बोलावलं आहे. पण नेमकी तेव्हाच डॉक्टर त्याच्या फिंगर प्रिंट्सची पाईल पाहतो. व त्याचे फिंगर प्रिंट मॅच झालेलं त्याला समजत व ते पाहून त्याला मोठा धक्का बसला आहे

जाहिरात
0507

त्यामुळे दिव्या त्याच्याशी गेम खेळत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे देवी सिंगच्या हाती पुन्हा एकदा आयतं कोलित लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

जाहिरात
0607

तेव्हा आता देवी सिंग सहजसहजी पोलिसांच्या हाती लागणार नाही हे मात्र खरं. त्यामुळे मालिकेचा शेवट होणार नसल्याचही स्पष्ट होत आहे.

जाहिरात
0707

तेव्हा आता देवी सिंगला पकडण्यासाठी पोलिसांना आणखी काय काय कष्ट घ्यावे लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या