मुंबई, 13 जून : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री मोहिना कुमारी (मोहना सिंह) यांनी यापूर्वी एक व्हिडीओ शेअर करुन कोरोनानंतरचे आपले अनुभव शेअर केले होते. त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती. त्यामध्ये मोहिना कुमारी यांचे पती सुयश, त्यांचे सासरे (उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री) सतपाल महाराज आणि त्यांची सासू देखील कोविड - 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. हे सर्वजण रुग्णालयात उपचार घेत होते. आता ते सर्व रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र ते सर्वजण अद्याप कोरोना पॉझिटिव्हचं आहेत. त्यांची तब्येत ठीक नसतानाही ते घरी परतले आहेत. याबाबत मोहिना कुमारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: बद्दल माहिती दिली आहे. शुक्रवारी मोहिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने ‘आम्ही घरी परत आलो आहे’ असे लिहिले आहे. पण आम्ही अद्याप कोविड - 19 पॉझिटिव्ह आहोत. आम्ही पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहोत. कोरोना अहवाल नकारात्मक होण्यासाठी आणखी किती दिवस लागतील हे आम्हाला माहित नाही. आम्ही जवळपास 10 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. त्यांनी पुढे लिहिले आहे की, आम्हाला आशा आहे हा विषाणू माझ्या शरीरात असला तरी मी त्याचा पराभव करू शकेन. परंतु तोपर्यंत आम्हाला अत्यंत कडक नियम पाळावे लागतील. आम्ही सर्व आता बरे आहोत. आपल्या समर्थनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मोहिना कुमारीच्या सासूंना 31 मे रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना हलकासा ताप होता. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट झाली आणि ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र त्यानंतर सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. हे वाचा- बळीराजासोबत तिफन ओढताना संभाजीराजे झाले भावूक, VIDEO शेअर करुन व्यक्त केली भावना