JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Deepika Padukone Health: दीपिकाला नक्की झालंय तरी काय? अनेक टेस्टनंतर समोर आली हेल्थ अपडेट

Deepika Padukone Health: दीपिकाला नक्की झालंय तरी काय? अनेक टेस्टनंतर समोर आली हेल्थ अपडेट

बॉलिवूड मस्तानी अर्थातच अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीबाबत काल एक चिंताजनक बाब समोर आली होती.

जाहिरात

दीपिका पादुकोण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर-   बॉलिवूड मस्तानी अर्थातच अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीबाबत काल एक चिंताजनक बाब समोर आली होती. अभिनेत्रीला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णलयात दाखल केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिचे चाहते चिंतेत होते. आता अभिनेत्रीच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणला सोमवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये अभिनेत्रीच्या विविध चाचण्याही करण्यात आल्या, ज्यामध्ये जवळपास अर्धा दिवस निघून गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु अद्याप अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला अचानक अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रिपोर्टनुसार दीपिकाला आता बरं वाटत आहे. अभिनेत्रीच्या प्रकृतीची अपडेट्स जाणून घेण्यासाठी एंटरटेनमेंट पोर्टल्सद्वारे दीपिका पादुकोणच्या टीमला संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीय.

यापूर्वीही जाणवला होता त्रास- दीपिकाला अस्वस्थतता जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांआधी अभिनेता प्रभासबरोबर हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाचं शुटींग करताना दीपिकाचा हार्ट रेट अचानक वाढल्यानं तिला रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा जवळपास 5-6 तास दीपिका रुग्णालयात होती. मात्र ती रुटीन चेक अपसाठी गेल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितलं होतं. **(हे वाचा:** Deepika Padukone : दीपिका पादुकोणची तब्येत ढासळली; 12 तास रुग्णालयात, याआधीही झाला होता असाच त्रास ) आगामी काळात दीपिका प्रभाससोबत दिसणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा दीपिकाचा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट आहे. यात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, अमिताभ बच्चन यांनी प्रभास-स्टारर चित्रपटासाठी काही दृश्यांचा शूटिंग केल्याचं समोर आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या